मराठी राजभाषा दिन विशेष : डॉक्टर महेश वसंतराव अभ्यंकर यांचे 'ग्रंथ तुमच्या दारी' अभियान


मराठी भाषेचा विकास व्हावा, मराठी वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्यात 'ग्रंथ तुमच्या दारी' हा उपक्रम राबविला जात असून, आता सोसायटी तेथे ग्रंथपेटी उपक्रमाद्वारे मराठी वाचनसंस्कृती रुजविण्याचा उपक्रम मुंबईसह राज्यात सुरू आहे.

२७ फेब्रुवारी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक वि. वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ग्रंथ तुमच्या दारी' योजनेच्या मुंबईचे मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी या उपक्रमाची व्याप्ती आता सोसायट्यांमध्येही सुरू केली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे माजी विश्वस्त विनायक रानडे यांनी वाचकांना घराजवळ उत्तम व वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १२ वर्षांपूर्वी 'ग्रंथ तुमच्या दारी' हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे परदेशातही दुबई, ओमान, बहारिन नेदर्लंड, यूएई, टोकियो, अटलांटा, स्वीत्झर्लंड, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया, ओमान, मॉरिशस, सिंगापूर आणि जपान येथील हजारो वाचकांना मराठी पुस्तके उपलब्ध झाली आहेत. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांतील सोसायट्यांमध्येही वाचनसंस्कृती वाढत आहे.

डॉक्टर महेश अभ्यंकर हे स्वतःही प्रतिभावंत लेखक आहेत. अभ्यंकर यांचे इमोझील हे अत्यंत  प्रभावी मनोबल देणारे पुस्तक आहे. कोरोना काळ हा आपल्यासाठी शारीरिक आणि मानसिक समस्या घेऊन आला. लॉकडाऊन आणि डिजिटल युगाने आयुष्याचे गणित पार बदलवून टाकले. सध्या जागतिक मंदी, नोकऱ्यांची कमतरता, शेअरमार्केट मधील चढउतार यामुळे कित्येक सामाजघटकांची मानसिक स्थिरता ढासळली आहे. वैयक्तिक पातळीवर मानसिक संतुलन प्राप्त करण्यासाठी असंख्य मार्ग आहेत. पुस्तक वाचन हा त्यातील उत्तम मार्ग आहे. या पार्श्वभूमीवर 'इमोझील मनोबल उंचवणाऱ्या कथा' या पुस्तकाची निर्मिती झाली. अल्पावधीत इंग्लीशमधे सहा आवृत्या आणि मराठीत महिन्याभरात दुसरी आणि वर्षभरात तिसरी आवृती आली. कोरोंना काळात आणि त्यानंतर बऱ्याच जणासाठी इमोझील पुस्तक प्रेरणा स्थान ठरेल.

संपर्क: डॉ महेश अभ्यंकर (९८२०४५०९८६)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.