सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली सरपंच परिषद


महाराष्ट्राच्या राजकारणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाने नेहमीच आपलं वेगळेपण जपलं आहे. प्रशासनाभिमुख राजकीय वाटचाल ही लोकशाहीतील सजग भूमिका मानली जाते. गावागावात ग्रामपंचायत स्तरावर विकासाचा गाडा ओढताना त्याद्वारे पर्यायाने तालुका जिल्हा आणि राज्यही समृद्धीच्या वाटेवर वेगाने दौडू लागतात आणि म्हणूनच पंचायत राज स्तरावर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर केवळ गावच्याच योजना नाहीतर राज्य आणि केंद्र यांच्या ध्येयधोरणाची दिशा म्हणून पहावं लागते.


हाच विचार मनाशी धरुन कोकणातील अग्रगण्य वृत्तवाहिनी अशी ओळख निर्माण करणारी 'कोकणशाही' या डिजिटल चॅनलने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील प्रसारमाध्यमांच्या इतिहासात प्रथमच 'कोकणशाही'च्या माध्यमातून होणाऱ्या या सरपंच परिषदेची सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेनीही आवर्जून दखल घेतली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानाने देखील जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले  आहे.


कोकणशाही आयोजित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्यासाठी भव्य- दिव्य परिषदेचे आयोजन करण्यात आहे. रविवार दिनांक २६ फेबुवारी २०२३ रोजी सकाळी ९. ३० वा. कुडाळ येथील मराठा समाज हॉल याठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


कोकणच्या पर्यायाने सिंधुदुर्गच्या ग्रामविकासाला बळकटी मिळावी, गावातील लोकप्रतिनिधींना योग्य त्या मार्गदर्शनाचे धडे मिळावेत व त्यातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य व्हावा या ह्या परिषदेच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे.


मान्यवर व्याख्यात्यांची प्रमुख उपस्थिती हे या सरपंच परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भास्करराव पेरे पाटील, (आदर्श सरपंच- गाव- पाटोदा, जिल्हा- औरंगाबाद) व पद्मश्री. मा. श्री. पोपटराव पवार - (सरपंच- गाव हिवरेबाजार, जिल्हा - अहमदनगर) या दोन प्रमुख मार्गदर्शन या मंचावरून होणार आहे.त्याचप्रमाणे कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय यादवराव, प्रसिद्ध उद्योजक मोहन होडावडेकर, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, यांच्यासोबत सिंधुदुर्गातील यशस्वी सरपंच, ग्रामसेवक आदी मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

सरपंच परिषदेच्या निमित्ताने ग्रामविकासाच्या १०१  योजनांच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन होणार आहे. परिषदस्थळी ग्रामविकासाला उपयोगी ठरणारी पुस्तिका 'कोकणशाही'च्या माध्यमातून होणार उपलब्ध अवघ्या २००/- रुपयात विक्रीस उपलब्ध होणार आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  भव्य दिव्य अशा या सरपंच परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कोकणशाहीचे संचालक तथा मुख्य संपादक साईनाथ गांवकर यांनी आवाहन केलं आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.