आता क्रिकेट खेळया मालवणीत्सुन !


काय मग मुंबईच्या गाववाल्यानो येतास मा ? मळ्यातल्या म्याचीची मजा मुंबईच्या ग्राऊंडवर खेळाक ! बा देवा म्हाराजा प्रस्तुत होय महाराजा प्रीमियर लीग 2023 वर्ष पहिले यांच्या वतीने सर्कल बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
भांडुप पश्चिम स्व. प्रमोद महाजन क्रीडांगणावर दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून हे सामने पार पाडणार आहेत.

होय महाराजा च्या निमित्ताने मुंबईतील मालवणी माणसाला एकत्रित आणण्याचे काम साईप्रसाद परब हा तरुण मागील काही वर्षे सातत्यानं करत आहे. मित्र वर्तुळात साई नावाने ओळख निर्माण केलेल्या साईप्रसाद परब यांनी मुंबईत नोकरीधंद्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या तरुणांना क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून गावचे गावपण जोडणाऱ्या उपक्रमाने नावीन्य निर्माण केले आहे. याचाच एक भाग म्हणजे एचएमपीएल अर्थात होय महाराजा प्रीमियर लीग

क्रिकेटसाठी सबकुछ असणाऱ्या या लीगमध्ये प्रमुख अट आहे ती म्हणजे मालवणी बोलता येणे. क्रिकेट कौशल्याप्रमाणे तुमचे टिपिकल मालवणी असणे आणि बोलणे हाच तुमचा एन्ट्री पास असणार आहे. मालवणीपणा जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या क्रिकेट स्पर्धेतील संघाची नावे ही तेवढीच आकर्षक आहेत.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.