'सोशल स्टॉक एक्सचेंज'ला अंतिम मंजूरी


राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) ला सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) लाँच करण्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. या एक्सचेंजला SEBI कडून यापूर्वी तत्वतः मान्यता मिळाली होती. आता अंतिम मंजूरी मिळाल्याची माहीती आहे.

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019-20 च्या त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात SSE च्या निर्मितीचा प्रस्ताव दिला होता. हे एक्सचेंज NSE चा एक वेगळा विभाग असेल. यामुळे देशातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना बाजारातून निधी उभारण्यास मदत मिळेल.

आता खाजगी कंपन्यांसारखं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन (एनपीओ) सोशल एंटरप्राइजेस, फॉर प्रॉफिट सोशल एंटरप्रायझेस (एफपीई) सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये स्वतःला लिस्ट करून पैसे उभारण्यास सक्षम असतील. सोशल स्टॉक एक्स्चेंज ही संकल्पना महामारीच्या काळात लोकप्रिय झाली आहे.

● एक्सचेंजकडून NPOसाठी निधी उभारण्यासाठी प्रक्रिया

▪️ सर्वप्रथम, सोशल स्टॉक एक्स्चेंज विभागामध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.
▪️ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, NPO निधी उभारण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात.
▪️ निधी उभारण्यासाठी, झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल यासारखी साधने जारी करावी लागतील.
▪️ ZCZP चा किमान इश्यू आकार 1 कोटी आणि अर्जाचा आकार 2 लाख आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.