भेटी लागी शिवा : कांदळगावचा श्रीदेव रामेश्वर आणि किल्ले सिंधुदुर्गवरील श्री शिवराजेश्वर भेट सोहळा - फोटो फिचर
February 11, 2023
0
ढोल-ताशांचा गजर आणि त्यातच सनईचा मधुर स्वर फटाक्याची आपणाजी... मार्गावर उभारण्यात आलेल्या गुढ्या तोरणे.... स्वागताच्या कमानी आणि कांदळगाव ते मालवण या मार्गावर हजारो भाविकांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करीत शुक्रवारी 10 फेब्रुवारीला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कांदळगाव येथील आपले राऊळ सोडून मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवरील थोरले आबासाहेब अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला निघालेल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेराने शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास छत्रपतींची भेट घेतली अन् उपस्थित सान्यांनीच दोन शिवांच्या या भेटीचा अनुपम सोहळा याची देही याची डोळा अनुभवत आणि शिवनामाचा जयघोष करीत सारा आसमंत दणाणून सोडला. या भेटी दरम्यान श्री देव रामेश्वर आणि त्याच्या पंचायतनसह रयते समवेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदीमाया आदिमाता आई भवानीचे दर्शन घेतले सुमारे अडीज तास किल्ले सिंधुदुर्गवर रंगलेल्या या सोहळ्याने साऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी दोन्ही शिवांच्यावतीने एकमेकांना भेटीचे नजराणे देण्यात आले.
Tags