विद्यार्थ्यांच्या भावविश्वातून भारतीय शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणणाऱ्या एक्झाम वॉरियर्स आता इंग्रजीसोबत भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त, हे पुस्तक तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया, आसामी, गुजराती, मराठी, पंजाबी, उर्दू आणि बंगाली भाषेतही उपलब्ध आहे.
Exam Warriors पुस्तकात परीक्षेच्या तणावाचा सामना कसा करावा याच्या टिप्स आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मार्गही पुस्तकात समजावून सांगण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांसाठीही हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. त्यातूनही त्यांना खूप काही शिकता येईल. खरं तर, पुस्तकात इयत्ता 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना टिप्स देण्याबरोबरच, पीएम मोदींनी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान काय लक्षात ठेवावे याबद्दल पालक आणि शिक्षकांना पुस्तकात पत्र देखील लिहिले आहे.
परीक्षेचा ताण आणि चिंता यापासून मुक्ती मिळवून देणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. या संदर्भात हे पुस्तक सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. परीक्षा वॉरियर्स बुकची पहिली आवृत्ती 3 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध झाली.