संध्याछाया आश्वस्थती 'विसावा'


डॉक्टर विवेक रेडकर  यांच्या दि रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचा एक भाग असणाऱ्या 'विसावा' या हेल्थकेअर शाखेचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला पार पडतोय. बाल्य तारुण्य आणि वृद्धावस्था या तीन अवस्थामधील वृद्धावस्थाच्या संगोपनात 'विसावा' नावाची स्वास्थवास्तू काळजी घेण्यासाठी सज्ज झालीय..

22 जानेवारीला दुपारी ४ वाजता रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू , उद्योजक विशाल परब, मानव साधन विकास संस्थेच्या चेअरमन सौ. उमा प्रभू, गोव्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. विवेक रेडकर व सुरेश झांटये यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. 


डॉक्टर विवेक रेडकर यांनी आपल्या वैद्यकीय संशोधनाला आणि रुग्णसेवेला द रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर  म्हणजेच डीआरएचआरसीच्या माध्यमातून रुग्णसेवेची निरंतर साखळी जोडली आहे. नव्वदच्या दशकात डेंग्यू पासून हत्तीरोगापर्यंतचा जनजागर असो किंवा एड्सपासून कार्डिओलॉजी अवरनेस असो किंवा अगदी आताच्या काळात न्युरॉलॉजीपासून ते पेनेडेमीक रिसर्च पेपर असो, डॉक्टर विवेक रेडकर यांनी सातत्याने या मातीत राहून कोकणचे आरोग्य निरंतर आणि सुदृढ ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. 

आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार हजार माणसामागे एक डॉक्टर हवाय तिथे वास्तवात साधारणपणे पंधराशे मागे एक डॉक्टर कसाबसा आहे..या सगळ्यात आरोग्य यंत्रणा अजून किती प्रभावी हवी हा फक्त 'हेल्थ मिनिस्ट्री' किंवा 'आयुष' चा प्रश्न नाहीय तर ती आपली सामाजिक बांधिलकी आहे याचं भावनेतून डॉक्टर विवेक रेडकर आरोग्यदूत बनून गोवा कोकण कर्नाटक परिघात कार्यरत आहेत.

सिनियर सिटीझन हा शब्द उच्चारला तरी त्यात फक्त दोन शब्द आठवतात एक तर सिनियर सिटीझनहेल्थ केअर पॉलिसी किंवा मग सिनियर सिटीझन मेडिकल केअर ! नात्याला वृद्धत्व आलं की जबाबदारी ढकलली जाते किंवा मग अडचणीना वास्तूचे मार्ग शोधले जातात..दरवेळी यात नकारात्मकता असते अशातला भाग नसतो, काही वेळी हतबलता किंवा सुश्रुषा हा भाग जास्त महत्वचा असतो. पण या सगळ्याचे वैद्यकीय भाषेत परिमाण शोधता तेव्हा मेडिकल केअर मग  प्रिअँटिव्ह मेडिकल केअर आणि त्यापुढे जाऊन क्युरेटिव्ह मेडिकल केअर अशा दोन टप्यात विभागलेले वर्गीकरण असे जर स्वीकारलं तर ते खऱ्या अर्थाने सकारात्मक बनते.

आज रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरने वैद्यकीय क्षेत्र म्हणजे अमर्याद नफा या प्रतिमेला छेद देत समाजात पुन्हा एकदा नव्या वैद्यकीय क्षेत्रावरच्या जनमानसाच्या प्रतिमेला उंचावण्याचा काम आजोळ आणि दिलासा या दोन मेडिकल ने केलंय. त्यात पुढचा अपग्रेड टप्पा आता विसावा ठरणार आहे.

मात्र असं जरी असले तरी वार्धक्यसोबत येणाऱ्या आजारविकाराना रुग्णालयीन वैद्यकीय उपचारांची फार मोठी गरज असते. सत्तरीउत्तर जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करणें आणि त्यांच्यावर नातेवाईक यांच्याकडून लक्ष ठेवणे यांच्यात तफावत वाढत अशा रुग्णांसाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरने पुढचा टप्पा कार्यान्वित केला आणि तो म्हणजे विसावा. वैद्यकीय उपचार तेही अगदी प्रसन्न मनाने घेता येऊ शकतात हे डीआरएचसी ने दाखवून दिलंय. बेडरिडेन पेशंट आणि तोही मायेच्या माणसाकडून उपचार घेतोय हे सुखद चित्र आज विसावामुळे दिसणार आहे. 

वार्धक्य, आजारपण अटळ असले तरी ते एकट्याचे असू शकत नाही, मायेची माणसे सोबत नसली आपलेपणानी सुश्रुषा करणारी माणसे सोबत आहेत हे डॉक्टर विवेक रेडकर यांनी पाहिलेले स्वप्न विसावामध्ये सत्यात उतरतेय.डॉक्टर विवेक रेडकर आणि सीमा रेडकर यांनी मालवणच्या रेडकर हॉस्पिटलच्या उभारणीवेळी पाहिलेलं हे स्वप्न आजोळ, विसावा आणि आता रेडी येथील दिलासाच्या निमित्ताने सत्यात उतरतेय.. 

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आज वेगवेगळ्या सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर कुडाळ, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवण, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर रेडी, आजोळ सिनियर सिटीझन मेडिकल केअर सेंटर नेरूर, आणि रेडी येथील डीआरएचसीचे दिलासा आणि आता नव्याने उदघाटन होत असलेले रेडी येथील विसावा सेंटर…ही यादी फक्त वास्तूची नावे नाहीयत तर  साठोत्तर जगण्याचा एक नवा मार्ग बनलाय.. 

© sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.