कोकण, अपरांत भूमी.. निसर्ग पाहणाऱ्याला जिंकवणारी आणि आयुष्याचा खरा आनंद मनमुराद जगायला आणि जगवायला शिकवणारी भूमी ! नरोत्तमच्या या भूमीने इथल्या माणसाला जगण्याची नवी उमेद दिली.. अशाच जगण्याच्या संजीवनवास्तूची आणि विचारांची ओळख करून घेताना इथल्या पानाफुलात, मातीत जो एक बृहस्पतीचा विचार रुजलाय , त्याच विचाराचं याच मातीत घट्ट मूळ रोवून, अथक संशोधन , प्रयत्नवाद, आणि केवळ हसण्यातून समोरच्याला जगण्याचा दिलेला विश्वास याचा चेहरा म्हणजे डॉक्टर विवेक रेडकर..
होय, डॉक्टर विवेक रेडकर हा शब्द उच्चारला की जगणं एका अतूट विश्वासाने उभे राहते. आणि या गोष्टीचे एकमेव कारण अतिशय स्पर्धा असणाऱ्या या वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर रेडकर हे आपल्या पेशंटशी डॉक्टर बनून नाही तर घरचा माणूस संवाद साधत गेले.. आज चार दशके डॉक्टर रेडकर यांनी कमावलेला हा विश्वास आज 'द रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर' नावाने विस्तारत चाललाय. आयुष्य क्षणभंगुर आहे हे मान्य केलं तरी आजघडीला डीआरएचआरसीने दिलेला वैद्यकीय विश्वास आयुष्य जगणं समाधानाचे बनवतोय !
डॉक्टर रेडकर यांचा हा प्रवास सुरु झाला तो मालवणच्या याच रेडकर हॉस्पिटलमधून.. सुरुवातीला केवळ एक हॉस्पिटल असणारी ही वास्तू केवळ मालवणपूरती मर्यादित न सिंधुदुर्ग, कोकण पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा राज्यांच्या सीमा पार करत गेली.. इथे माणसे मृत्यूच्या भयाने उपचारासाठी यायची आणि जाताना आपल्या घट्ट मुठीत जगण्याचा नवा आशावाद आणि नजरेत डॉक्टर रेडकर यांचा चेहरा घेऊन जायची..मालवणचे रेडकर हॉस्पिटल म्हणजे आज अत्याधुनिक सेवेनी बनलेले एक परिपूर्ण आरोग्यधाम आहे.
पण या सगळ्यात डॉक्टर रेडकर अस्वस्थ होते, कारण त्यांच्या नजरेत वयोवृद्ध रुग्णांना कायमस्वरूपी उपचारासोबत त्यांना नवं आयुष्य देण्याची संकल्पना चौकटीत अडकली होती. आणि मग एके दिवशी दिलीप लाड यांनी या सगळ्या संकल्पाचा सुमुहूर्त केला आणि उभं राहिलं आजोळ.. आजोळ म्हणजे काय तर डॉक्टर सीमा रेडकर यांच्या शब्दात 'आजी आजोबांचे घर'. आजोळ हे वृद्धांसाठी आहे म्हणजे वृद्धाश्रम नाही..
डॉक्टर रेडकर यांच्या सारख्या अवघं आयुष्य वैद्यकीय क्षेत्रात अर्पण करणाऱ्या संशोधकी व्यक्तित्वाचे हे एक अभूतपूर्व स्वप्न आहे आणि आज जी महाराष्ट्राची गरज आहे. अगदी सोप्या शब्दात एडिंग लाईफ टू इयर्स दॅन इयर्स टू लाईफ.. उतारवयातले आयुष्य एकाकी का असावे, त्यात आनंद का असू , वर्तमान प्रसन्न का असू नये या प्रश्नांत उभारले गेले ते आजोळ.. कधीकाळी बालपणाची संकल्पना आज नात्यात, शहरात , समाजात हिरावणाऱ्या वय वाढलेल्याना आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आजोळ सिनियर सिटीझन मेडिकल केअर सेंटर जगण्याची नवी उमेद देतेय.
आजोळ हा विचार सिनियर सिटीझन मेडिकल केअर एवढंच मर्यादित नाहीय, तर त्याला दिलेली प्रिअँटिव्ह मेडिकल टुरिझम आणि त्यापुढे जाऊन क्युरेटिव्ह मेडिकल टुरिझम अशा दोन टप्यात विभागलेले वर्गीकरण जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा त्यातला वृद्धाश्रम पल्याडचे एक नवं जगणे 'आजोळ' शिकवतोय.. आजोळ मध्ये कुणीही पेशन्ट नसतोच, आणि जिथे घरचा माणूस असतो तिथे फक्त श्रुषुशा असते.. मायेच्या हातानी मायेच्या माणसाची काळजी आजोळ मध्ये प्रत्येक पावलावर जाणवते. अगदी स्वास्थ्यापासून, बौद्धिक क्षमतेपर्यंत सगळं काही आजोळमध्ये उपलब्ध आहे.आजोळमधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज तीच समाधानाची जाणीव आहे जी डॉक्टर विवेक रेडकर नावाच्या एका विश्वासपूर्ण हास्यात आहे
आज द रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ने आजोळच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्र म्हणजे अमर्याद नफा या प्रतिमेला छेद देत समाजात पुन्हा एकदा नव्या वैद्यकीय क्षेत्रावरच्या जनमानसाच्या प्रतिमेला उंचावण्याचा काम आजोळने केलंय. अडीच एकरात पसरलेल्या या आजोळमध्ये व्यक्तिगत लक्ष, उत्तम आहार, रुटीन मेडिकल चेकअप आणि सगळ्यात महत्वाचे अगदी घरी असल्याचा आनंद मिळत असल्याने संपन्न आयुष्याची भावना वाढतेय.
मात्र असं जरी असले तरी वार्धक्यसोबत येणाऱ्या आजारविकाराना रुग्णालयीन वैद्यकीय उपचारांची फार मोठी गरज असते. सत्तरीउत्तर जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करणें आणि त्यांच्यावर नातेवाईक यांच्याकडून लक्ष ठेवणे यांच्यात तफावत वाढत अशा रुग्णांसाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरने आजोळचा पुढचा टप्पा कार्यान्वित केला आणि तो म्हणजे विसावा.
वैद्यकीय उपचार तेही अगदी प्रसन्न मनाने घेता येऊ शकतात हे डीआरएचआरसीने दाखवून दिलंय. बेडरिडेन पेशंट आणि तोही मायेच्या माणसाकडून उपचार घेतोय हे सुखद चित्र आज दिलासामुळे दिसतोय.दिलासा पाठोपाठ विसावाच्या माध्यमातून डीआरएचआरसीने आणखी एक नवं पाऊल घट्टपणे रोवलय. आजोळमध्ये प्रिअँटिव्ह म्हणून सांभाळले जाणारी रुग्णसेवा ही विसावाच्या माध्यमातून क्युरेटिव्ह केअरपर्यन्त सांभाळले जाणार आहे . एकूणच डीआरएचआरसीच्या या दिलासा आणि विसावामुळे ज्येष्ठ नागरिकांवर केवळ उपचारच नाही तर मायेची नवी ऊब मिळणार आहे.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या विसावा या नव्या आरोग्यधामामुळे केवळ वैद्यक क्षेत्रालाच नव्हे तर मेडिकल टुरिझमलाही एक नवे दालन निर्माण होतेय. वार्धक्य, आजारपण अटळ असले तरी ते एकट्याचे असू शकत नाही, मायेची माणसे सोबत नसली आपलेपणानी शुश्रूषा करणारी माणसे सोबत आहेत हे डॉक्टर विवेक रेडकर आणि सीमा रेडकर यांनी मालवणच्या रेडकर हॉस्पिटलच्या उभारणीवेळी पाहिलेलं हे स्वप्न आता विसावा निमित्ताने सत्यात उतरतेय..
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आज वेगवेगळ्या सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर कुडाळ, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवण, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर रेडी, आजोळ सिनियर सिटीझन मेडिकल केअर सेंटर नेरूर, आणि रेडी येथील डीआरएचआरसीचे दिलासा आणि विसावा सेंटर…ही यादी फक्त वास्तूची नावे नाहीयत तर लाखो लोकांना जगण्याचा अढळ विश्वास देणारी संजीवनी आरोग्यधाम आहेत. Trama care and and orthopaedic unit, Critical care unit, dialysis and urology, ophthalmology, neurology and physiotherapy या अशा कैक आणि उच्च दर्जाच्या सुविधा डॉक्टर रेडकर यांच्या डीआरएचसीकडे आहेत. पण त्याहीपेक्षा नात्यांमुळे एकाकीपण लाभलेल्या ज्येष्ठ नागरिकांना नव्याने आयुष्य देणारे आजोळ, किंवा मोठ्या मोठ्या शहरातही ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी बेड दीर्घकाळ उपलब्ध नसणे या गोष्टीला विसावा हा केवळ पर्याय नाहीय तर साठोत्तर जगण्याचा एक नवा मार्ग बनलाय..
जगण्याच्या वाटेवर उतारवय हा टप्पा आहे, पण हा टप्पा रडतरखडत नाही नव्याने आयुष्य जगण्याची संधी आहे, त्यासाठी आजोबा आज्जी या नव्याने मेडिकल टुरिझम करायला, नवं जग पहायला आणि हो नव्यानं स्वतः पहायला..
येताय ना आपल्या 'विसावा'मध्ये नवं जगणं शोधायला!