आजवर महाराष्ट्रात रोप-वे ऍक्ट 1955 सेक्शन 3 शासन निर्णय टी आर एम 5-82-/395(आर 4ए ) दिनांक 7डिसेंबर 1984 नुसार स्थापन झालेल्या एरिअल रोपवे ऍडव्हायजरी बोर्ड कडून रोप-वे प्रमोटर्स ना रोप-वे विकासकांना २१ निरनिराळ्या विभागांत ना-हरकत दाखल्यांसाठी खेपा घालाव्या लागत होत्या. ह्यामध्ये या संबंध प्रक्रियेत एक प्रकारच्या वेळखाऊ धोरणाला रोप-वे विकासकांना सामोरे जावे लागत होते परिणामी राज्यात नवीन रोप-वे प्रकल्पांची निर्मिती ज्या गतीने व्हायला हवी त्या गतीने होत नव्हती.
अशा प्रसंगी काळानुसार ज्यात सुधार अपेक्षित आहेत अशा बॉम्बे रोप-वे ऍक्ट 1955 मध्ये आवश्यक ते बदल करावे जेणे करुन पर्यटन व्यावसायिकांना त्याचा लाभ मिळून राज्यात रोप-वे पर्यटन उभारी घेऊ शकेल याकरिता पर्यटन महासंघ आणि मालवणचे श्री विष्णू (बाबा) मोंडकर व त्यांची कार्यकारिणी अतोनात प्रयत्न करीत होती.
नवनिर्वाचित सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र चव्हाण जी यांच्याकडे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर हवाई रज्जुमार्ग मंडळाच्या मंगळवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी मा.मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत राज्यातील ११ रोप-वे प्रोजेक्ट प्रकल्प मार्गी लागण्यासाठी रोप वे पॉलिसी मध्ये आवश्यक बदल करण्याचे ठरविण्यात आले.
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाप्रमाणे कार्यवाही व्हावी राज्यातील सर्व रोप वे प्रकल्प हे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे जोडणारे असून वरील नियमांची शिथिलथा आल्यास राज्यात रोप वे प्रोजेक्ट उभारण्यास मार्ग मोकळा होऊन राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन मध्ये वाढ होईल यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे पाठपुरावा करण्यात आला होता यावर हवाई रज्जुमार्ग मंडळाच्या मंगळवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी मा.मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या उपस्थित झालेल्या मिटींग मध्ये राज्यातील ११ रोप वे प्रोजेक्ट प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मा.उप मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांच्या सुचनेप्रमाणे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मागणी नुसार रोप वे पॉलिसी मध्ये बदल करण्याचे ठरविण्यात आले असून या संबंधी प्रस्ताव मा.बांधकाम मंत्री यांच्याकडे हवाई रज्जूमार्ग मंडळाच्या माध्यमातून सादर करून सदर प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.
या विषयी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रविंद्रजी चव्हाण यांचे पर्यटन क्षेत्रातील ऐतिहासिक बदलासाठी आभार मानण्यात येत असून सदर विषय मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र भाजपा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ.श्री.अमेयजी देसाई यांचे ही महासंघास सहकार्य लाभले आहे अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.
या ठरावामुळे राज्यातील रोप-वे पर्यटनाचा सुवर्णकाळ सुरु होईल ह्यात शंका नाही! रोप-वे च्या पुनरुज्जीवनाचे रोवले गेलेले हे रोप येणाऱ्या काळात पालवी धरेल आणि लवकरच त्याची फळं रोप-वे विकासकांनाच नव्हे तर पर्यटकांना सुद्धा चाखता येतील असा विश्वास आहे!
- सिंधुदुर्ग360°