सिंधुदुर्ग येथील विमानतळाला कोकणचे सुपुत्र बॅरीस्टर नाथ पै यांचे नाव देण्याच्या ठराव विधिमंडळात मंजुर करण्यात आला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदर शासकीय ठराव मांडला. या विमानतळ परिसरात बॅ.नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.