महाराष्ट्राची संस्कृती, कलाकौशल्याची ओळख सर्वाना व्हावी तसेच सह्याद्रीच्या कुशीतील लोकवस्त्रे, खाद्य, नृत्य, संगीत, कला या सर्वागिण संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतुने अस्तित्व ट्रस्टतर्फे जत्रा महाराष्ट्राची या मराठमोळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन १५ ते१८ डिसेंबर या कालावधीत बृहमुंबई महानगर पालिका, क्रीडा भवन, शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे भरले आहे. या जत्रा महाराष्ट्राची प्रदर्शनात विदर्भाचे मांडे, पुण्याचे मटका चिकन, कोल्हापुरची झणझणीत मिसळ, इथपासुन ते अलिबागचे कोळी आगरी मालवणी पध्दतीचे स्टाँल, उस्मानाबादचे कंदी पेढे, येवल्याची पैठणी, सोलापुरी चादरी, चप्पल असे सपुर्ण जिल्ह्याचे वैशिष्ट्ये असलेले ५० वेगवेगळे स्टाँल उभारण्यात आले आहेत.
तसेच या प्रदर्शनात केद्रंबिंदु असलेले म्हणजेच शिवकालीन शस्त्रप्रदर्शन सर्वांना नक्कीच आवडेल. या प्रदर्शनला नक्की भेट द्या.