पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानामुळे 'लोकल पर वोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाला प्रोत्साहन दिले गेले आहे.
यावेळी हर घर तिरंगा अभियानामुळे देशभरात 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री झाली असून, त्यामुळे जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे म्हणणे आहे की देशभक्ती आणि स्वयंरोजगाराच्या या अभियानामुळे देशभरातील लोकांमध्ये देशभक्तीची एक अद्भुत भावना आणि को-ऑपरेटिव्ह व्यवसायाची शक्यता निर्माण झाली आहे.
हर घर तिरंगा अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमताही दाखवून दिली आहे. ज्यांनी देशातील जनतेची तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती केली.
पूर्वी भारतीय तिरंगा फक्त खादी किंवा कापडात बनवण्याची परवानगी होती, ध्वज संहितेतील या दुरुस्तीमुळे देशातील 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला, ज्यांनी स्थानिक शिंपींच्या मदतीने त्यांच्या घरी किंवा छोट्या ठिकाणी तिरंगा ध्वज मोठ्या प्रमाणावर बनवला.