भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, अवघ्या विश्वाने त्याला दाद दिली. ज्या काळात देश उध्वस्त होण्याची स्थिती होती, त्याच काळात देशाने जागतिक नेतृत्व म्हणून ठसा उमटवला. या विजयात आपल्या जीवाची पर्वा न करता पंतप्रधानांच्या महाभियानात योगदान देणाऱ्या अनेक हातांची साथ होती. या सर्वांचे ऋण पंतप्रधानांनी आठवणीने व्यक्त केले आहे.
कुडाळमधील डॉ. संजय केसरकर यांना पाठवलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे की तुमच्या सक्रिय सहभागातून भारताने नवा इतिहास लिहिला आहे. १६ जानेवारी २०२१ पासून १७ जुलै २०२२ पर्यत तब्बल २०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा आपण या कोविडविरोधातील लढ्यात गाठला आहे. या मोहिमेतील राष्ट्रीय धैर्याचा आदर्श पुढील पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
पाठीवर शाब्बासकीची थाप देणाऱ्या समर्थ हातांमध्येच हा आदर्श निर्माण करण्याची प्रेरणा असते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पत्रातून जाणवल्याशिवाय रहात नाही. जीव वाचवणाऱ्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेत मोदींजींना सक्रिय साथ देणाऱ्या कुडाळच्या डॉ. संजय केसरे यांचे समस्त जिल्हावासियाकडून आज कौतुक होत आहे