प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याचे शालेय जीवन .परंतु covid-19 च्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष मुलांची नियमित शाळा होऊ शकली नाही. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरु होते परंतु मागील दोन वर्षात तो आनंदाचा क्षण मुलांच्या वाट्याला आला नाही. मात्र येणाऱ्या 15 जूनला महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मुलेे शाळेची पायरी अगदी आनंदाने उत्साहाने चढणार आहेत.
मुलांचा हाच आनंद उत्साह कायम ठेवण्यासाठी आमच्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मध्ये शालेय परिसर सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले . यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सुभाष नाईक सर यांनी पुढाकार घेतला.
प्रशालेचे कला शिक्षक श्री समीर चांदरकर याच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील इयत्ता आठवी ,नववी व दहावीचे विद्यार्थि प्रतिक्षा मेस्त्री , सिद्धाली पांचाळ, सानिया कुडतरकर, मिथिल आंगचेकर , श्रेया चांदरकर , रुची ढोलम, पूर्वा मेस्त्री, पूर्वा चांदरकर,रश्मी पांचाळ ,माजी विद्यार्थी आकाश बिरमोळे, राहुल जाधव ,प्रसाद मेस्त्री, वेदांत पोटफोडे यांनी शाळेच्या दर्शनी भिंतीवर वेगवेगळे सामाजिक संदेश देणारी पोस्टर रंगविली .
या कामात विद्यार्थ्यांचा सहभाग हा महत्त्वाचा होता.अतिशय उत्साहाने भिंतींवर ॲक्रीलिक कलर चा वापर करून या चित्रांमध्ये जीव ओतला, मुलींचे शिक्षण, योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरण संवर्धन, मोबाईल चे दुष्परिणाम, धुम्रपानाचे दुष्परिणाम , पुस्तकांशी मैत्री, देशाभिमान असे सामाजिक संदेश देणारी पोस्टर्स विद्यार्थ्यांनी शालेय आवारातील भिंतीवर रंगविली.
आपल्या मे महिन्याच्या सुट्टी चा योग्य वापर करत मुलानी कलात्मक वृत्तीला जोपासले. बऱ्याच वेळा असे रंगकाम प्रोफेशनल माणसांकडूनच करून घेतली जातात.परंतु या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींसाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या