माझा सिंधुदुर्गचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा

सिंधुदुर्ग मधिल मुंबईस्थीत तरुण युवकांचा माझा सिंधुदुर्ग ग्रुपतर्फे सिंधुदुर्ग मधिल हुशार,होतकरु व विशेषतः कोविड काळात पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती प्रदान सोहळा शनिवार  ४ जून २०२२ रोजी कुडाळ येथील मराठा समाज हाँल मधिल चिंतामणी सभागृहात  संपन्न झाला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते साई जळवी फिल्मसचे प्रोड्युसर,दिग्दर्शक,निर्माता श्री.साई जळवी आणि  अध्यक्षपद दैनिक तरुण भारत सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख श्री.शेखर सामंत यांनी भुषविले.यावेळी राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शिवराज सावंत सर,कातकरी समाजातील मुलांसाठी वसतीगृह चालविणारे श्री.उदय आईर,श्री.संदिप तुळसकर सर,श्री.अंकुश कणेरकर सर,श्री.संजय जाधव सर, माझा सिंधुदुर्गचे संस्थापक श्री.विकास पालव,मयेकारीन फेम अर्चना परब व  माझा सिंधुदुर्गचे सर्व क्रियाशील सदस्य उपस्थित होते.


यावेळी कातकरी मुलांच्या वसतीगृहासाठी बावीस हजाराचा इन्व्हर्टर श्री.उदय आईर यांना माझा सिंधुदुर्ग कडुन प्रदान करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर श्री.शेखर सामंत, श्री.साईनाथ जळवी, श्री.शिवराज सावंत, श्री.संदिप तुळसकर, श्री.कणेरकर, श्री.जाधव,श्री.आईर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.शुभम धुरी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.