पोंभुर्ले होणार आता 'पुस्तकाचे गाव'!

पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पोंभुर्ले गावाला आता एक नवी ओळख मिळाली आहे.मराठी  भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राज्य शासन राबवित आहे. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेंतर्गत कोकण महसूल विभागात पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड करण्यात आली आहे.

राज्यभरातील पत्रकार पोंभुर्ले येथे येउन दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा करतात. पोंभुर्ले गावाला शासनाने कोकणातील पहिले पुस्तकांचे गाव जाहिर केल्याने पोंभुर्ले गाव पुन्हा एकदा पर्यटनदृष्ट्या नजरेत येणार आहे.

पुस्तकाचे गाव विस्तार योजनेंतर्गत मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने शासन विविध योजना आखत आहे. पुस्तकांचे गाव ही त्यातील एक महत्वपूर्ण योजना असुन त्याची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव सुरु करुन योजनेचा विस्तार करण्याचा शासनाचा मनोदय आहे. शुक्रवारी झालेल्या शासन निर्णयानुसार कोकण विभागातून देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावाची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासनाकडे माणुसकी फाऊंडेशनने प्रस्ताव केला होता.



पुस्तकाच्या गावात विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशा सर्वांगीण ग्रंथांनी सुसज्ज असे भव्यदिव्य दालने होणार आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होईल. यापूर्वी पोंभुर्ले गाव आद्य पत्रकार बाळशास्त्री जान्भेकर यांचे जन्मस्थळ म्हणुन प्रसिध्द आहेच. मात्र, पुस्तकांचे गाव जाहिर झाल्याने पर्यटन वृध्दिसाठी निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.