जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणामन देशांतर्गत शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी गुंतवणूकदारांना 6,32, 530 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारी 2,46,79,421.28 कोटी रुपये होते. बाजारातीस घसरणीमुळे बाजार भांडवल 2,40,46,891 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांना 4 मार्च 2022 पर्यंत 7,631 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.
● कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरल पार
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2008 नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळी गाठली आहे. ब्रेंट क्रूडचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 147 डॉलर प्रति बॅरल इतका विक्रमी होता.
● सोन्याच्या भावावर परिणाम
या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहारावर तर होतोच आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेवरही या युद्धाचे पडसाद उमटताना दिसतायत. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. सोन्याचा भाव आज 54 हजारांवर पोहोचला आहे. युक्रेन रशिया युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या दरात कमालीची घट झाली होती. युद्धाआधी सोन्याचा प्रति तोळा भाव 48 हजारांच्या जवळपास होता. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजारांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,400 इतका आहे. मागील 12 दिवसात सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत. युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले तर सोन्याचा भाव 58 हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी कोरोनाच्या काळात सोन्याचा भाव 58 हजारांपर्यत गेला होता.
रशियाचा युक्रेनवरील हल्ला आता केवळ दोन्ही देशांपुरता नाही तर जागतिक विकासासाठी मोठा धोका बनत आहे. ब्रेंट क्रूड 139 डॉलरवर, 13 वर्षांच्या उच्चांकावर कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या, हा भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी मोठा धक्का आहे. कारण भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या 80 टक्के आयातीवर अवलंबून आहे. तेलाच्या किमतींमध्ये होणारी प्रत्येक वाढ ही भारतासाठी मोठी जोखीम आहे.