सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा गावच्या मुलाने जे काही केलंय त्याची आता मुंबई फॅन झालीय. सध्या दिवा येथे वास्तव्यास असणाऱ्या तेजस हंजनकर याने सुरक्षित वाहतुकीचे नियम पाळून अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने वॅगनआर कारने प्रवास करत जनशताब्दीच्या वेगाशी स्पर्धा करत चक्क रेल्वेच्या वेगाला हरवण्याचा पराक्रम केलाय.
●कोण आहे हा तेजस हंजनकर ?
तेजस मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचऱ्याचा गावचा, पण सध्या वास्तव्यास दिवा मध्ये कारचालक आहे. समाजासाठी नेहमी धडपडणाऱ्या युवकाने कोरोना काळात टॅक्सीला रुग्णवाहिका बनवून शेकडो लोकांचे प्राण वाचवले होते.
कल्याण – मुंबई ते गोवा हे बाराशे किलोमीटरचे अंतर छोटय़ा वॅगनआर कार चालवून कोकणच्या अतिजलद जनशताब्दी एक्सप्रेस मेलला दिव्यातील तरुण तेजस हंजनकर याने मागे टाकण्याचा विक्रम केला आहे.त्याच्या या विक्रमाची नोंद घेतली जाणार असून विक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. १ मार्च रोजी तेजसने हा विक्रम केला, तेजस हा कार चालक आहे. तो दिवा शहरात राहतो.
● तेजसच्या मेहनतीचे गणित
तेजस हा कारचालक असल्याने तो वेळ, अंतर आणि वेगाचे गणित जुळवण्याचे नवे प्रयोग करीत असतो. मुंबई गोवा रिटर्न हे अंतर त्याने जनशताब्दी एक्सप्रेसच्या आधी कापण्याचा विक्रम केला आहे. जनशताब्दी एक्सप्रेस गाडी मुंबईहून पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निघते. ती मडगावला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहचते. त्याठीकाणचा हॉल्ट घेऊन गाडी पुन्हा दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी निघते. ती मुंबईत रात्री ११ वाजून २० मिनिटांनी पोहचते.
●तेजसने कसे साधले वेळेचे गणित ?
जुन्या मुंबई गोवा मार्गाने तेजसने वॅगनआर कारने प्रवास केला. मुंबई ते मडगाव हे अंतर त्याने रस्त्याने आठ तास ५ मिनिटात पार केले. तर पुन्हा मडगाव ते मुंबई हे अंतर ८ तास २७ मिनिटात पार केले. परतीच्या प्रवास २२ मिनीटांचा फरक का पडला याविषयी तेजस यांना विचारणा केली असता रस्ता खराब असल्याने हे अंतर पडले. मात्र, दोन्ही वेळा जाताना आणि येताना त्याने जनशताब्दी एक्सप्रेसच्या आधी पोहचण्याचा विक्रम केला. त्याने १६ तास ३१ मिनिटांच्या प्रवासात केवळ ३४ मिनिटांचा थांबा घेतला होता. तो त्याच्या रेकाडॅ टाईममध्ये समाविष्ट नाही. त्याने एकूण १७ तास ५ मिनिटे प्रवास केला.
,"Tejas" express 😍🙏
ReplyDelete