२०२२ उन्हाळी सुट्टीवर अखेर शिक्कामोर्तब !

कोरोनामुळे पहिली ते बारावीच्या मुलांना उन्हाळी सुट्टी मिळेल का, अशी मागील काही दिवस चर्चा सुरू होती. मात्र त्याला आता पूर्णविराम मिळालाय आणि नेमकी सुट्टी कधी मिळणार याबद्दल घोषणा झालीय

मात्र, नियमित अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करून शाळांना 2 मे ते 12 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता पाहता विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरू होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शालेय विद्यार्थ्यांच झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थी आणि पालक नाराज झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करुन या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांवेळेस देता येणार आहेत. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहेत. मात्र, या सुट्टया देताना त्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिले आहेत.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.