मराठी नववर्षाची सुरूवात म्हणून या दिवशी गुढीपाडवा देखील साजरा केला जातो. पाडव्याच्या दिवशीच अनेक मंडळी आपल्या जीवनातील नवीन गोष्टींचा आरंभ करण्यास सुरूवात करत असतात. यंदा हा सण शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. मात्र यंदा चैत्र नवरात्री कधी सुरू होणार याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेलीय.
शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्येही दुर्गा मातेची नऊ रूपे पूजण्याची परंपरा आहे. वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी आणि आनंद कायम राहावा म्हणून दुर्गा मातेचे पूजन करण्याची पद्धत आहे. यंदा चैत्र नवरात्र २ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान असणार आहे. यामध्ये अष्टमी ९ एप्रिल दिवशी अष्टमी साजरी केली जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे काही जण घटस्थापना करतात. तर काही महिला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे देखील कार्यक्रम करतात.
● चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त शनिवार, २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६.२२ ते ८.३१ पर्यंत असेल.
●या शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी ०२ तास आणि ०९ मिनिटे असेल.
●याशिवाय घटस्थापनेवरील अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटे एवढा असेल.
चैत्र नवरात्रीमध्ये देखील पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हाचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिध्दीदात्री इत्यादी देवीच्या रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे.
🙏🙏💐
ReplyDelete