प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या घरात देवघर असतं. घरात पूजाप्रार्थनाही केली जाते. पण कळत-नकळत होणार्या काही चुकांमुळे आपल्याला इच्छित लाभ मिळत नाहीत. पूजा अर्चनेचं योग्य फळ मिळण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी जाणून घेऊया देवघरासंबंधित महत्त्वाचे बहुपयोगी नियम
● देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.
● देव पुजेच्या वेळेस ईतरांशी बोलु नये.
● तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नका. एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नका.
● भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.
● दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेस करू नये.
● स्त्रियांनी कधीही. तुळस तोडू नये.
● एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन शंख, तीन गणपती कधीही ठेवू नयेत.
● भस्म लावल्याशिवाय व गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केल्याशिवाय, महादेवाची पूजा करू नये.
● देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात.
● संकल्पाशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये.
● शिवमंदिरात झांज', सूर्यमंदिरात 'शंख' व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये.
● बेला शुष्क पत्रेही पूजेला चालतात. तसेच शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे. मात्र सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही.
● द्वादशीस तुळस तोडू नये.
● जलकमळावाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवीची पूजा कधीही करू नये.
●बेलाचे पान नेहेमी पालथे वाहावे,
● श्री गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय, अन्य दिवशी तुळस वाहणे, व्यर्ज आहे.
● गायत्री किंवा नवार्णव मंत्र आसनावर बसूनच करावा. रस्त्याने जाता येता करू नये.
●आपली जपमाला व आसन, दुसऱ्यास वापरण्यास कधीही देऊ नये.
● मारुतिच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांच्या मूर्तिची व तसबीरींची कधीही दक्षिणेकडे करू नये. (अपवाद, मृतव्यकतींचे फोटो)
● गंध उगाळून झाल्यानंतर ते तबकडीत काढूनच नंतर देवांना लावावे.
● गुरुचरित्र, दुर्गासप्तशती व अन्य प्रासादिक ग्रंथाची पाने उलटताना, कधीही बोटाला थुंकी लावू नये.
● देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने एका लयीत म्हणावीत व मंत्र मनात जपावेत.
● देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये.
●देवघरात देवांच्या तसबीरी लावताना, त्या एकमेकांसमोर लावू नये.
●आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये.
●देवाला, एका हाताने कधीही नमस्कार करू नये.●देवांची आरती करतांना, निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये.
"●कांदा, लसूण. हे पदार्थ वापरलेले नैवेद्य, देवास दाखवू नये.
●देवीचे पूजन केवळ एका उपचाराने, म्हणजे 'कुंकवाने होते.
● देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.
● देवपूजेतील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देवाचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा.
● देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून, नंतर अर्पण करावा.
●शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये.
●देवघरातील देवमूर्तिवर विटाळशीची छाया पडणार नाही याची काळजी घ्यावी.
●नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा.
●तुलसीपत्र वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे. दूर्वा वाहाताना दुर्वांची अग्रे आपल्याकडे ठेवावीत. फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत.
●देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.
● देवघराला कळस करू नये.
● देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध. कुंकुमतिलक, अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे