दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग अध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उद्योजकांसाठी काम करणारी दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिकी) संस्थेची सभा प्रहार भवन कणकवली येथे संस्थापकीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योगांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभा करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली आहे. याची माहिती व प्रसारण करण्यासाठी उद्योजकांना लाभ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.
अनुसूचित जातीतील उद्योजकांसाठी देशभरात उद्योगधंद्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. यांचा उद्योगात चिकाटी ठेवून काम केल्यास हे यश आपण खेचून आणू शकतो तसेच अनुसूचित जाती मधील उद्योजकाने उत्पादित केलेला माल सरकार दरबारी कसा विक्री केला पाहिजे व त्याचा लाभ कसा घेतला पाहिजे यासाठी डिकीच्या माध्यमातून एक भरीव कामगिरीचा विश्वास विजय केनवडेकर यांनी व्यक्त केलाय.