कोकण विकासासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या कोकण भूमी प्रतिष्ठान आणि समृध्द कोकण प्रदेश संघटना यांच्या वतीने ग्लोबल कोकण उद्योग परिषद आणि कोकण आयडॉल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात कोकण आयडॉल सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
कोकण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी कोकण आयडॉल म्हणून गौरवण्यात येणार आहे.