प्रत्येक सण अनुभवावा तो कोकणभूमीतच ! प्रत्येक सण म्हणजे दिवाळसण एवढाच मोठा असतो, आणि शिमगोत्सव म्हणजे श्रद्धेचा आणि उत्साहाचा आसमंतात भिडलेला अनाहत नाद असतो.
गावकरीही होळीच्या मानाचा नारळ घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असतात. गाऱ्हाणे बोलणे झाल्यावर गतवर्षीची जुनी होळी सन्मानाने उतरून त्या ठिकाणी नवी होळी उभारली जाते.
विशेष म्हणजे ही होळी जाळली जात नाही किंवा तोडलीही जात नाही सांगेली गिरोबाप्रमाणेच ही होळी देखील वर्षभर तेथेच सन्मानाने उभी राहते.
पुढील वर्षी ती उतरवून त्या जागी नवी होळी उभी राहते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरू आहे.
🙏
ReplyDelete