ले.कर्नल मनीष कदम यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांना १६ मार्च २००८ रोजी काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील चत्लुरा या गावामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांशी लढतांना वीरमरण आले. ले.कर्नल मनीष कदम यांनी कंठस्नान घातलेल्या अतिरेक्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा चीफ प्लॅनिंग कमांडर हफीज नजारा उर्फ हाफीज हैदर उर्फ हाफीज हामजा याचा समावेश होता, जो १९९८पासून भारतीय लष्करच्या “मोस्ट वाँटेट” यादीत होता. शहीद कदम यांना वीरचक्र पदकाने (मरणोत्तर) सन्मानित करण्यात आले. ले.कर्नल मनीष कदम यांनी त्यांच्या १७ वर्षांच्या लष्करीसेवेमध्ये जवळपास ६/७ वर्षे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी मुकाबला केला. त्यांच्या पत्नी कर्नल डॉ. श्रीमती स्मिता यादेखील लष्करामध्ये कार्यरत आहेत.
ले.कर्नल मनीष कदम हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावचे. लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये असलेल्या ले.कर्नल कदम यांची नियुक्ती २२ राष्ट्रीय रायफलचे कमांडींग ऑॅफिसर म्हणून झाली होती.ले. कर्नल मनीष कदम हा त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. तरीही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना जाणीवपूर्वक लष्करात पाठविले. त्याकरीता मनीष यांना सुरुवातीपासून मानसिक आणि शारिरीकदृष्टया सक्षम करण्याचे पध्दतशीर प्रयत्न केले गेले. मनीष यांची आई सौ. शुभदा यांचे १६ फेब्रुवारी, २०२० रोजी दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे निधन झाले. तर वडील शशिकांत कदम हे सध्या आजारी असून ते अणाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील आनंदाश्रय या वृध्दाश्रमात वास्तव्याला आहेत.
मनीष यांच्या वीरगतीनंतर खचून न जाता शशिकांत कदम यांनी आपल्या वीरपुत्राच्या स्मरणार्थ “शहीद ले.कर्नल मनीष कदम (कीर्तीच) फाऊंडेशन” स्थापन केले असून त्या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात Services Preparatory Institute(SPI)च्या धर्तीवर संस्था उभारली जावी अशी त्यांची मनोकामना आहे.
- डॉ. दीपक परब, उपाध्यक्ष,
- कुमार कदम, सरचिटणीस,
शहीद ले.कर्नल मनीष कदम (कीर्तीचक्र) फाऊंडेशन
💐💐
ReplyDelete