कोकणातील टुरिस्ट गाडी चालकांसाठी 'येताव' ॲप अतिशय उपयुक्त.
कोरोना ने जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आणि अनेकांची वाट लागली त्यात टुरिस्ट गाडी चालक व मालक प्रामुख्याने होते. कारण एक तर बर्याच जणांनी लोनवर गाड्या घेतल्या आहेत आणि प्रवासीच नव्हते, पुन्हा बँका रीपेमेंटसाठी तगादा लावत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोकणातल्या तीन तरुणांनी *'येताव'* हे ॲप विकसित केले आहे. *'येताव'* हे ॲप, प्रवासी व गाडी मालक दोघांसाठी उपयुक्त ठरत आहे. या ॲपचा टी परमिट गाडीच्या मालकांना दुहेरी फायदा होतो
◆ कुठून-कुठे-कधी जायचे आहे अशी ट्रिप टाकून ठेवली की पॅसेंजर स्वतःच कॉन्टॅक्ट करतात किंवा या कंपनीतून गाडी मालकाला पॅसेंजर ची माहिती देण्यात येते.
◆भाडे सोडल्यावर परत येताना जेव्हा गाडी खाली असते तेव्हा तो प्रवास देखीव *'येताव'* ॲप मध्ये टाकून ठेवल्यास परतीचे प्रवासी देखील मिळू शकतात.
त्यामुळे हे ॲप टुरिस्ट गाडी चालकांना आणि प्रवाश्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल यांत शंका नाही.
◆ येताव ॲप कसे काम करते ?
● या ॲप मध्ये रजिस्टर केल्यावर गाडीचा मालक प्रवास करताना मुंबई ते कोकणात साधारण कोणत्या भागात जाणार आहे किंवा कोकणातून परत येताना कोणत्या भागातून मुंबईकडे येणार आहे याची माहिती टाकतो. त्याचबरोबर कधी जाणारे व किती सीट रिकाम्या आहेत तेही टाकतो.
● ज्याला प्रवास करायचा आहे त्या प्रवाशाने मग मुंबई ते कोकणातल्या आपल्या जवळच्या मुख्य गावाचे नाव टाकले कि त्या दिशेने गावाकडे जाणाऱ्या गाड्या दिसतील. त्यातील एखादी गाडी निवडून त्यांस अँपमधून विनंती पाठवता येईल व चॅटद्वारे बोलून घेता येईल.
अश्याप्रकारे 'येताव' हे ॲप तुम्हाला प्रवाशी मिळवून द्यायचे काम करणार आहे.
◆ येताव ॲप सध्या मोफत आहे.*
◆येताव ॲप कोकण रूट वरच चालू करण्यात आलेले आहे.