डिजिटल बँकिंग व्यवहारांत आघाडीची पेटीएम पेमेंट्स बँक रिझर्व्ह बँकेच्या रडारवर आली आहे. पेटीएम पेमेंट्सला नवीन ग्राहकांची नोंदणी करण्यास बंदी घातली आहे.
रिझर्व्ह बँकेला पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत चिंताजनक माहिती समोर आल्यानं बँकंन हा आदेश जारी केला आहे. पेटीएम पेमेंट्सला आयटी सिस्टीमचे तातडीनं ऑडिट करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. नव्या आयटी फर्मद्वारे पेटीएम पेमेंट्स बँकेचं आयटी ऑडिट केलं जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर केल्यानंतर पेटीएम पेमेंट्सच पुढील भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने तत्काळ प्रभावानं निर्णय लागू केल्यामुळं अर्थजगतात खळबळ माजली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डिजिटल बँकिंग यंत्रणेतील व्यवहारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.