● गेल्यावर्षीच्या वजा ८ टक्क्यांवरून राज्याच्या अर्थव्यवस्थेने घेतली उभारी
● यंदा राज्याची अर्थव्यवस्था १२.१ टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज
● राज्यावरील कर्जाचा डोंगर 6 लाख 15 हजार कोटींवर
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी विधिमंडळात सादर झाला. या पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेची सकारात्मक चित्र समोर आलं आहे. मागील वर्षी कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर वजा ८ टक्क्यांवर खाली गेला होता. २०२१-२२ या वर्षात राज्याचा अर्थव्यवस्थेत १२.१ टक्के वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे राज्याच्या महसूल उत्पन्नातही वाढ होण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालत व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढण्याचा अंदाजही अहवालात व्यक्त केला आहे. सध्या राज्यावर ५ लाख ३८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते ६ लाख १५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे.