राज्यातील सिंधुदुर्गसह 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने कोरोना परिस्थितीनुसार आखलेल्या वर्गांमध्ये या 14 जिल्ह्यांचा A गटात समावेश होतो. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर इतर जिल्ह्यांमध्ये हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
राज्य सरकारच्या या नव्या गाईडलाईन्सनुसार राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल पूर्णपुणे लॉकडाऊनमुक्तीकडे असल्याचं दृश्य आहे.
राज्य सरकारच्या या नव्या गाईडलाईन्सनुसार राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल पूर्णपुणे लॉकडाऊनमुक्तीकडे असल्याचं दृश्य आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटले?
◆मुंबई शहर
◆मुंबई उपनगर
◆पुणे
◆भंडारा
◆सिंधुदुर्ग
◆नागपूर
◆रायगड
◆वर्धा
◆रत्नागिरी
◆सातारा
◆सांगली
◆गोंदिया
◆चंद्रपूर
◆कोल्हापूर