महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ


प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथा'चा मान मिळाला. उत्तर प्रदेशचा चित्ररथ यंदा 'सर्वोत्तम चित्ररथ' ठरला, तर 'सीआयएफ'च्या चित्ररथाला 'सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलिस फोर्समधील चित्ररथ' म्हणून सन्मानित करण्यात आलं..

सर्व सेवा दलांमधील 'सर्वोत्तम चित्ररथा'चा मान भारतीय नौदलाला मिळाला. याच गटात हवाई दलाचा चित्ररथ 'सर्वाधिक लोकप्रिय' ठरला. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना विभागून पुरस्कार मिळाला.. 

यंदा संचलनात जवळपास 12 राज्यांचे व 9 मंत्रालयांचे, असे 21 चित्ररथ सहभागी झाले होते. त्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये 'वाराणसी काशी विश्वनाथ धाम'चा देखावा साकारला होता..

‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर महाराष्ट्राचा चित्ररथ सादर केला होता. त्यात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवलं होतं. कास पठारावरील 22 वनस्पती व फुले व 15 प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश केला होता. चित्ररथासाठी विशेष गाणे तयार केलं होतं. त्याला गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता. या गाण्याद्वारे 'झाडे लावा, झाडे जगवा' हा विशेष संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.