कुणकेश्वर यात्रेसाठी आमदार नितेश राणे यांच्याकडून मोफत बस सेवा


●२८ फेब्रुवारी ते २ मार्च तीन दिवस सुरू राहणार मोफत एसटी सेवा..

● कणकवली, देवगड, विजयदुर्ग डेपोतून सुटणार एसटी बस



कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील श्री. देव कुणकेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी मोफत एसटी प्रवासाची सेवा सुरू केली आहे. त्यासाठी प्रतिदिवशी १० एसटी सोडल्या जाणार आहेत.

२८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान साजरा होणाऱ्या या जत्रोत्सवात कणकवली एसटी आगरातून चार एसटी बस तर मालवण एसटी डेपोतून चार आणि विजयदुर्ग डेपोतून दोन गाड्या अशा दहा गाड्या उत्सवाच्या तीन दिवस सुटणार आहेत. यात्रेकरूंची प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार नितेश राणे यांनी तीन दिवस तीन ठिकाणांवरून मोफत दररोज १० एसटी बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.



त्यामुळे यात्रेकरूंची गैरसोय दूर होणार आहे. सदरहू बसेस विजयदुर्ग,  कणकवली व मालवण या एसटी आगारांमधून दिवसभर कुणकेश्वर पर्यंत फेऱ्या मारणार असून यात्रेकरूंसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था या फेऱ्यातून केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान या मोफत सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.