आंगणेवाडी यात्रेसाठी यंदा विशेष ट्रेन, येतास मा ?

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी यात्रोत्सव 24 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. देश विदेशातील भाविक आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती लावतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडत आहे. भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं लक्ष लागलेलं असतं. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बसचं तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेचा 'यात्रोत्सव आंगणेवाडी'ची यात्रा नावाने प्रसिद्ध आहे.

कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात. देवीला कौल लावला जातो. कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.


गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. देश विदेशात असलेले लाखो भक्त या एका दिवसासाठी आंगणेवाडीत येऊन देवीचे दर्शन घेतात. परंतु कोरोना महामारीमुळे या सर्व भक्तांना श्री भराडी मातेचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून श्री भराडी देवीचे दर्शन घेता येणार असल्याची नियोजन आता सुरु झालेय. 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी देवीचा यात्रोत्सव 24 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. देश विदेशातील भाविक आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती लावतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडत आहे. भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं लक्ष लागलेलं असतं. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बसचं तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते.
यंदाच्या वर्षी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. आंगणेवाडी आणि होळी सणादरम्यान रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. आंगणेवाडी आणि शिमगा उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


गाडी क्रमांक 01161 
लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड (साप्ताहिक) विशेष 
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23 फेब्रुवारी 2022 (बुधवार) रोजी 23.45 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ही गाडी सावंतवाडीला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01162 
सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक) विशेष गाडी 
सावंतवाडी रोडवरून 24 फेब्रुवारी 2022 (गुरुवार) रोजी सकाळी 11:00 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 23:05 वाजता पोहोचेल.

या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबतील.

कोच रचना : एकूण 23 कोच = फर्स्ट एसी - 01 कोच, 2 टायर एसी - 01 कोच, 3 टायर एसी - 05 कोच, स्लीपर - 11 कोच, सेकंड सीटिंग - 03 डबे, SLR - 02.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.