कोकणकाशी समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा दि. १ मार्च २०२२ रोजी संपन्न होत असून दि. २ मार्च २०२२ रोजी देवस्वार्यांच्या पवित्र तिर्थस्नानाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यावर्षीची यात्रा एका दिवसाची असून मोठ्या थाटात उत्सव साजरा होणार आहे.
देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर तसेच ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्यामार्फत यात्रेची पुर्वतयारी युद्धपातळीवर सुरु असून दर्शनासाठी येणार्या सर्व भाविकांना सुलभ रितीने दर्शन घडावे यासाठी देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या मार्फत दर्शनमंडप दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदाच्या यात्रेमधे येणार्या व्यापारीवर्गाला दुकाने थाटण्यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वर याच्याकडून नियोजन केले जात असून. कोविड नियमांचे पालन करुन येणार्या सर्व व्यापार्यांना सुलभ रितीने व्यापार करता यावा यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वर यांनी योग्य नियोजन केले आहे. यात्रेला येणार्या देवस्वार्यांची कुणकेश्वर क्षेत्री कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष नियोजन केले जात असून यावर्षीची यात्रा ही पुर्वीच्या थाटातच मोठ्या दिमाखात साजरी होणार आहे.
#उत्सवसिंधु #सिंधुदुर्ग360° #कुणकेश्वरजत्रा