नवी मुंबईला मुंबईशी अर्ध्या तासात जोडणारी वॉटर टॅक्सीचे लोकार्पण करण्यात आलय. 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट आणि उरलेल्या 7 स्पीड बोटी अशा एकूण 8 वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबईचा आणि मुंबई करांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे.
सुरुवातीला नवी मुंबई वॉटर टॅक्सी ही तीन मार्गांवर धावणार आहे.
● नेरुळ-बेलापूर-जेएनपीटी-एलिफंटा-नेरुळ,
● डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल-जेएनएनपीटी-एलिफटा-नेरूळ
3 डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल-बेलापूर-नेरूळ-डोमेस्टिक
या मार्गावर क्रूझ टर्मिनल दरम्यान टॅक्सी सेवा उपलब्ध असेल.
टॅक्सी प्रत्येक थांब्यावर सुमारे 10 मिनिटे थांबेल. मुंबईहून दर एक तासाला वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या संख्येनुसार सेवेत वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 32 आसनी, 40 आसनी आणि 50 आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे.
बेलापूर जेट्टीवरुन ही वॉटर टॅक्सी सुटेल. बेलापूरवरुन मुंबईला अवघ्या अर्ध्या तासात पोहोचणं या वॉटर टॅक्सीमुळे शक्य होणारे. तसंच वॉटर टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीही सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
बेलापूर जेट्टीवरुन ही वॉटर टॅक्सी सुटेल. बेलापूरवरुन मुंबईला अवघ्या अर्ध्या तासात पोहोचणं या वॉटर टॅक्सीमुळे शक्य होणारे. तसंच वॉटर टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीही सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
प्रवाशांना जेटीपर्यंत सहज नेण्यासाठी बससेवेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील जेटीवर जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. सीएसटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, चर्चगेट, वाशी स्टेशन, बेलापूर आणि जेनएनपीटीजवळ ब्रिज टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे.
● अशी असेल तिकीट व्यवस्था
प्रवासी वॉटर टॅक्सीची तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येणार आहेत. टॅक्सी सुटण्याच्या किमान 30 मिनिटे आधी तिकीट काढावं लागणार आहे. ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी कंपनीने 3 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय.वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी एकेरी प्रवाशांना 750 रुपये मोजावे लागणार आहेत. दुतर्फा भाडे 1200 रुपये असेल. 12 हजार रुपये खर्चून मासिक पासची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे. टॅक्सींसाठी ग्रूप बुकिंग करणाऱ्यांना सुमारे 15 टक्के सवलत दिली जाईल. ही किंमत सध्या तरी लोकलनं प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही जास्त आहे.
बेलापूर येथून भाऊच्या धक्क्यासोबतच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरही या बोटी चालवल्या जाणार आहेत. 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट आणि उरलेल्या 7 स्पीड बोटी अशा एकूण 8 वॉटर टॅक्सीला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.