72 तासांचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच !

● मेगाब्लॉकमुळे पनवेल येथे एक्स्प्रेससाठी शॉर्ट टर्मिनस 

● मध्य रेल्वेचा पुन्हा 72 तासांचा मेगा ब्लॉक 

● कोकणात जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द 

मध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवर ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी जम्बो मेगा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा जलद मार्गावर ७२ तासांचा मेगा ब्लॉक करण्यात आला आहे. एकूण ४३७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

● पनवेल येथे एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

11004 सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस ३,४,५ आणि ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस ५, ६ आणि ७फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

10112 मडगाव – मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस  ४, ५ आणि ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

12202 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस  ३, ४, ५ आणि ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

12620 मंगळुरु जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस ४, ५ आणि ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

●बदललेल्या मार्गाची माहिती घ्या !

ठाणे आणि दिवा दरम्यान अस्तित्वात असलेल्या ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गावर ५ फेब्रुवारी २०२२ रोजी च्या ००.०० वाजल्यापासून (शनिवार/रविवार मध्यरात्री १२ वाजता) ते ७फेब्रुवारी२०२२ च्या ००.०० वाजेपर्यंत (सोमवार/मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत – ७२ तासांचा)

५ फेब्रुवारी २०२२ च्या ००.०० वाजल्यापासून (मध्यरात्री १२ वाजल्यापासून) ते ६ फेब्रुवारी २०२२ (२८ तास) च्या ०४.०० वाजेपर्यंत विद्यमान अप जलद मार्गावर

यामुळे ब्लॉक कालावधीत मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांचे कामकाज खालीलप्रमाणे असेल:

• ४फेब्रुवारी२०२२ च्या २३.१० वाजल्यापासून (रात्री ११.१०) ते  ६फेब्रुवारी२०२२ च्या ०४.०० (पहाटे ४.००) वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत.

•  ६फेब्रुवारी२०२२ पासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि नवीन बोगदा-१ मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालविण्यात येतील.

• ४फेब्रुवारी २०२२ च्या २३.१० वाजल्यापासून (रात्री ११.१०) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि ठाण्याला पोहोचणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ब्लॉक पूर्ण होईपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावर ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ५ मार्गे वळवण्यात येतील.

• अप आणि डाउन धीम्या मार्गावरील उपनगरीय सेवा नव्याने टाकण्यात आलेल्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून म्हणजे ठाणे – कळवा – मुंब्रा – दिवा निर्धारित मार्गावर चालविण्यात येतील.

• ब्लॉक कालावधीत वसई रोड/पनवेल/रोहा दरम्यानच्या मेमू सेवा खाली दिलेल्या विशेष वेळापत्रकानुसार धावतील (पश्चिम रेल्वे मेमू सेवा वगळता मध्य रेल्वेच्या मेमू सेवांचे नियमित वेळापत्रक रद्द राहील)

• डाऊन जलद उपनगरीय सेवा कळवा स्टेशनच्या नवीन प्लॅटफॉर्म क्र. ३, मुंब्रा प्लॅटफॉर्म क्र. ३ आणि निर्धारित दिवा प्लॅटफॉर्म क्र. ३ मार्गे नव्याने घातलेल्या डाउन जलद मार्गावर चालविण्यात येतील.

• ठाणे-दिवा मार्गे पारसिक बोगद्यादरम्यान विद्यमान डाऊन आणि अप जलद मार्ग ५व्या आणि ६व्या मार्गावर सुरू केल्या जातील.

•  ५फेब्रुवारी २०२२ रोजी सुमारे १७५ वेळापत्रकीय उपनगरीय गाड्या रद्द राहतील, तथापि काही उपनगरीय गाड्या विशेष म्हणून धावतील.


मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द

22119/22120 मुंबई – करमळी – मुंबई एक्सप्रेस  ५ आणि ६फेब्रुवारी  २०२२ रोजी सुटणारी.

12051/12052 मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस  ५, ६ आणि ७फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

11085 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस ७फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.
11086 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ८फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

11099 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस ५फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.
11100 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस  ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

22113 लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचुवेली एक्सप्रेस ५फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.
22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ७फेब्रुवारी२०२२ रोजी सुटणारी.

12224 एर्नाकुलम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस  २फेब्रुवारी २०२२ आणि ६फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.
12223 लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम एक्सप्रेस ५फेब्रुवारी २०२२ आणि ८फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

12220 सिकंदराबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस  ४फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.
12219 लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद एक्सप्रेस  ५फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

12133/ 12134 मुंबई – मंगळुरू जंक्शन- मुंबई एक्सप्रेस . ४फेब्रुवारी २०२२, ५फेब्रुवारी २०२२, ६फेब्रुवारी २०२२ आणि ७फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

11003/11004 दादर- सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस ७ आणि ८फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

50103/50104 दिवा – रत्नागिरी- दिवा पॅसेंजर ५, ६आणि ७फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस४, ५,६़ आणि ७फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.

10105 दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस  ५, ६, ७आणि ८फेब्रुवारी २०२२ रोजी सुटणारी.


ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार ०५ फेब्रुवारी ते सोमवार ०७ फेब्रुवारी,२०२२ दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेने करण्यात आले आहे.

रेल्वे विभागाकडून शनिवार दिनांक शनिवार ०५ फेब्रुवारीला रात्री ०१ .३० वाजल्यापासुन ते सोमवार ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ०१.३० वाजेपर्यत ७२ तासांचा महामेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी १० मिनिटांच्या प्रस्थानांतराने आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा स्टेशन या मार्गावर १५ मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात २०५ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकिय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणुन सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.