● सह्याद्रीच्या लेकीची जिल्हावासीयांना साद
● कर्ली नदीच्या संवर्धनासाठी सरसावली हिरकणी
● उगमापासून संगमापर्यंत, प्रवाहापासून तिरापर्यंतची शोधमाला
हिरकणी सुवर्णा वायंगणकर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारीशक्तीचा एक उत्तुंग भ्रमणगाथा आहे.. सातत्याने गडकोटांची परिक्रमा आणि नव्या ट्रेकर्सला प्रोत्साहन हा सुवर्णाचा अनुभव अनेकांसाठी आयुष्य बदलवणारा ठरलाय. म्हणूनच सुवर्णा ही अनेकांसाठी प्रेरक 'हिरकणी' बनलीय. याच सुवर्णाने आता आपल्या गावच्या नदीसाठी एक मोठे पाऊल उचललय. कर्ली नदी संवर्धनासाठी तिने आता सहकार्यासाठी एक पत्र लिहून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नमस्कार माझ्या प्रियजनांनो,
आजपर्यंत अनेक गड किल्ले सर केले, नऊवारी नेसून, आपल्या संस्कृतीची आठवण ठेवून. तुम्ही मला प्रेमाने हिरकणी नाव दिले. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातला माझा प्रवास तुमच्या शुभेच्छांमुळे अतिशय चांगला चालला आहे.
हिरकणीने ज्या निश्चयाने रायगडाचा दुर्गम बुरुज रात्रीच्या अंधारात एकटीने उतरला त्याच निश्चयाने मी देखील ध्येयसिद्ध झाले आहे.मी परुळ्याची. माझ्या गावाची नदी, कर्ली नदी, आमची जीवनदायिनी साद घालते आहे. गेली तीन वर्षे मनात नदीचा आवाज घुमतो आहे. पण मागची दोन वर्षे कोरोना मुळे मला गप्प बसावे लागले.
आता मात्र मागे जाणे नाही...
होय, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नदी परिक्रमा करणार आहे.
ज्या कर्ली नदीच्या पाण्यावर आमचे सगळे जीवन अवलंबून आहे. शेतीभाती, नारळी पोफळी, मासेमारी, सगळं सगळं! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी ही आपली कर्ली नदी. तिची परिक्रमा!
कुठून बरं उगम पावते, कशी आणि किती वाटा धुंडाळत जाते, कुठकुठल्या गावातून जाते, किती अडथळे पार करते, कुठ प्रवाह मोठा असेल, कुठ छोटाही असेल, खोल असेल, उथळ असेल, कुठले पक्षी, कुठले मासे, कसली कसली झाडे आणि वनस्पती.... सगळं पाहायचं आहे आम्हाला.
तुम्ही म्हणाल गुगल मॅप बघ उघडून, मॅप बघून मार्ग समजेल, नदीचे मन समजेल का हो, नदीकाठच्या लोकांचे मन, त्यांचे जीवन समजेल का हो! नाही न, म्हणून तर मला प्रत्यक्ष पहायचंय, सगळीच्या सगळी कर्ली नदी, तिच्या काठाकाठाने जायचयं, पार देवबागच्या संगमापर्यंत!
मला माहित आहे, ह्यातून कोणाला कसली अर्थप्राप्ती होणार नाही, उलट खर्चच आहे सगळा, पण ही काही हौस नाही केवळ. काल नदी कशी होती, आज कशी आहे हे पाहून, तिचे उद्याचे अस्तित्व कसे असेल, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
एकटीने कसं पेलणार हे शिवधनुष्य, सोबत हवी, साथ हवी. काही सोबती आहेत ह्या ध्येयाची वाट चालणारे! एक सह्य सखा आहे, दिगवळे नरवडे गावचा शैलेश जाधव.
वाटेवरची गावे आहेत, तिथले काही ग्रामस्थ रोज सोबत करणार आहेत. सात ते आठ दिवस लागतील. रोज साधारण 20 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणार आहोत.
या आठ दिवसातील आमचे आणि सोबत्यांचे चहा, नाश्ता, जेवण, छायाचित्रकार, बॅक अप टीम, त्यांचे लॉजिस्टिक्स, ह्या सगळ्याला जवळपास दोन ते अडीच लाख रुपये लागणार आहेत.
माझी झोळी रिकामीच आहे. म्हणून तुम्हाला आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहे. तुम्ही एक रुपया केलेली मदत पण आमच्यासाठी बहुमोल असणार आहे.
मग इतकी यातायात करून ही परिक्रमा का करायची, थांबा, सांगते!
✓सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायात नदीचे स्थान ठळक करणे.
✓ह्या परिक्रमेच्या निमित्ताने गिर्यारोहक श्री. अरुण सावंत यांना मानवंदना देणे.
✓जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नदीचे पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक महत्त्व अधोरेखित करणे.
✓पर्यटनासाठी जलवाहतूक सुरू करण्यासाठी अभ्यास करणे.
✓नदीकाठची नैसर्गिक पर्यटन स्थळे,देवस्थाने पर्यटन नकाशावर आणणे.
✓नदीकिनारी चालणाऱ्या सांघिक शेतीचा आढावा घेणे, तिथल्या सेंद्रिय मालाला बाजारपेठ मिळवून देणे.
✓पावसाच्या सुरुवातीस नदीत चालणाऱ्या मासेमारी वर बंदी आणण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे.
✓सर्वात महत्वाचे म्हणजे नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जनमानसांत जागृती करणे.
नदी वाचवणे ही काळाची गरज आहे, परिक्रमा हे निमित्त आहे, लोक संवादाचे, अभ्यासाचे!
ह्या हिरकणीचे एक पाऊल उचलण्यासाठी तुमच्या एका पावलाची साथ गरजेची आहे, मोलाची आहे.
तुमची लाडकी,
सुवर्णा वायंगणकर
8010083511
आजपर्यंत कुणीही न केलेला विचार सुवर्णा करतेय. कर्ली नदी, नदीचे तीर, आणि संगम या सगळ्याची परिक्रमा केवळ नदीच्याच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी महत्वाचा ठरणार आहे..कर्ली नदीच्या या अभ्यासमोहिमेत तुम्हीही आर्थिक मदत करुन खारीचा वाटा उचलू शकता.
Payment Details:
Karli Nadi Parikrama
Gpay Number- 9404897754
T. J. JADHAV
KOTAK BANK
A/c No. 4312186353
IFSC KKBK0000631
Good one
ReplyDelete