● स्वराध्याचा मालवणात कृष्णांक महोत्सव
● 8 आणि 9 जानेवारीला अनोखा नाट्य महोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य नाट्यचळवळ म्हणून स्वराध्या फाउंडेशन मालवणचा नेहमीच उल्लेख करण्यात येतो. स्वराध्या फाउंडेशनने 2022 मध्ये आपले हेच वेगळेपण जोपासत कृष्णांक महोत्सव - २०२२चे आयोजन केले आहे. कै. रुक्मिणी कृष्णा नेवगी आणि कृष्णा पांडुरंग नेवगी यांच्या स्मरणार्थ स्वराध्याचा "कृष्णांक महोत्सव - २०२२ हा रंगमंचीय आविष्काराची पर्वणी ठरणार आहे. एकांकिका,दीर्घांक आणि नाटक अशा तिन्ही नाट्यप्रकारांचा एकत्रित महोत्सव असे या कृष्णांक महोत्सवाचे स्वरुप असणार आहे. दिनांक ८ ते ९जानेवारी २०२२ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे या कृष्णांक महोत्सव संपन्न होणार आहे.
शनिवारी ८ जानेवारी सायंकाळी 5 वाजता या कृष्णांक महोत्सवाचे औपचारिक उदघाटन सोहळा पार पडणार आहे. या महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता, संस्कार भारती, पुणे निर्मित 'द प्लॅन/रॅन्ड वध, जॅक्सन वध या दीर्घांकाने होईल. या कलाकृतीचे लेखक - योगेश सोमण आणि दिग्दर्शन योगेश सोमण, रश्मी देव यांनी केले आहे
शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता समांतर सांगली, निर्मित "समांतर" ही लेखक दिग्दर्शक इरफान मुजावर यांची एकांकिका सादर होईल. त्यांनतर रात्रो ८.३० वाजता, इंडियन पीपल्स थिएटर अकादमी (ipta) पुणे निर्मित 'मी भारतीय' हा दीर्घांक सादर केला जाईल. याचे
लेखन प्रदिप तुंगारे आणि दिग्दर्शन रवींद्र देवधर यांनी केलं आहे.
रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी कृष्णांक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कलांकुर ग्रुप मालवण निर्मित सायलेंट स्क्रीम ही एकांकिका सादर होईल. याचे लेखन सिद्धार्थ साळवी तर दिग्दर्शन सचिन टिकम यांनी केले आहे.
सकाळी ११ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ निर्मित 'आहे मनोहर तरी' हा दीर्घांक सादर करण्यात येईल. या कलाकृतीचे लेखन आणि दिग्दर्शन वर्षा वैद्य यांनी केलं आहे.
दुपारी १२ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ निर्मित
'बोझं' ही एकांकिका सादर होईल. या एकांकिकेचे लेखन नागसेन सपकाळे तर दिग्दर्शन केदार सामंत यांनी केलंय.
महोत्सवाची सांगता सायंकाळी 7 वाजताअभिनय, कल्याण निर्मित, 'सायलेन्स मॅटर चालू हाय' या नाट्यकृतीने होणार आहे. यांचे लेखन कै.रमेश पवार /महेश निकम तर दिग्दर्शन अभिजित झुंजारराव यांचे आहे