सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग प्रकाशित

●सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग प्रकाशित
● महाराष्ट्रातील एकमेव शास्त्रशुद्ध पंचांग म्हणून महाराष्ट्रात ओळख
● ‘सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाची‘ अकरा वर्षांची सिद्धमोहोर
शके १९४४ चे अर्थात इ.स 2022-2023 या वर्षाचे शुभकृत् संवत्सराचे धर्मशास्त्र संमत ‘सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग’ प्रकाशित झाले आहे.

धर्मशास्त्र ,सणवार, व्रते, ज्योतिष, वास्तुशास्त्र व मंत्रशास्त्र इ.विषयक शास्त्रोक्त व उपयुक्त माहिती आणि शंकासमाधान;  घरोघरी संग्रही असावा असा ठेवा किंबहुना लघु धर्मसिंधुच म्हणायला हरकत नाही...!

 ‘सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाची वैशिष्ट्ये:--

१) वर्षभरातील प्रमुख सण, एकादशी, प्रदोष, सत्यनारायण व्रत,उदयास्त, गुरुपुष्यामृतयोग, पंचकप्रारंभ,महालय श्राद्ध इत्यादी फक्त एका दृष्टीक्षेपात जाणण्याचे कोष्टक
२) बारा महिन्यातील सणवार, व्रते इत्यादींची संकल्पांसह उपयुक्त माहिती.
३) उपनयन-विवाह यांचे इ.स 2023 डिसेंबर पर्यंतचे शास्त्रशुद्ध मुहूर्त. त्याचप्रमाणे वास्तुशांती-साखरपुडा-डोहाळजेवण-जावळ-बारसे-गृहप्रवेश यांचे मुहूर्त.
४) यावर्षीच्या पंचांगातील विविध विषय:- गुरुपुष्यामृतयोग माहितीपर लेख, गंगास्नान महात्म्य, प्रत्येक पंधरवड्याचा हवामान-निसर्गचक्र-तेजीमंदीचा अंदाज, ह्रदयरोग निवारक मंत्र, स्पर्श-अस्पर्श विचार, शिखाबन्धन विचार, अमावास्या जन्म फलित, यमतर्पण व भीष्मतर्पण विधान इत्यादी बरेच काही...
५) पृथ्वीवर अग्नी असलेले दिवस आयते दिलेले आहेत.
६) भारतात दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या ग्रहणांचे सविस्तर विवेचन
७)फक्त एका मिनिटात विंशोत्तरी महादशा काढण्याचे कोष्टक तसेच भारतातील कोणत्याही गावाचा सूर्योदय व सूर्यास्त काढण्याचे कोष्टक

यासह अनेक विषयांवर संपूर्ण अभ्यासात्मक विवेचन करण्यात आले आहे.

संपर्क:- सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे(पुणे), दूरभाष- 9823916297
संकेतस्थळ : www.deshpandepanchang.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.