आता गरज कोकणच्या वायनरीच्या श्रीमंतीची

वायनरी हा जगातील एक प्रमुख उद्योग आहे. इंग्लंड , स्वित्झर्लंड,  फ्रान्स , इटली ,अमेरिकेसारखे प्रगत देश या देशातील एक प्रगत उद्योग म्हणून वायनरी कडे पाहिले जाते. मुख्यत द्राक्ष याचबरोबर आंबा, जांभूळ, अननस, मध विविध फळांच्या रसापासून वाईन बनवता येते. इटली , फ्रान्स सारख्या प्रगत देशांमध्ये असंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये आणि बागांमध्ये वाईनरी हा उद्योग करतात. 


जगातील सर्व प्रगत देशांमध्ये फळांची वाईन हे अतिशय लोकप्रिय हेल्थ ड्रिंक आहे. या देशांमध्ये वायनरी टुरिझम सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय पर्यटक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये जाऊन वाईन टेस्ट करतात आणि दर्जेदार वाइनचा आनंद घेतात . शेतात जाऊन वाईन विकत सुद्धा घेतात. पाश्चिमात्य देशांमध्ये वाईनरी चे अनेक ब्रँड शेतकऱ्यांनी विकसित केलेले आहेत. हा अतिशय प्रतिष्ठेचा शेतीपूरक व्यवसाय आहे. इटली फ्लोरेंस मध्ये मी स्वतः वाईन टुरिझम प्रत्यक्ष पाहिले आहे. आपल्या देशात सुला वाईन यांनी वायनरी टुरिझमचे आदर्श मॉडेल नाशिक जिल्ह्यात विकसित केले आहे. कोकणात डहाणू येथे सुरू जानते हा वाईन चा ब्रांड येथील युवा शेतकरी प्रियांका सावे यांनी विकसित केला आहे. या वायनरी ला सुद्धा हजारो पर्यटक भेट देतात.


कोकणच्या विकासाला गती देणारा वाईन उद्योग आहे. कोकणातील जांभळे, हापूस आंबा, अननस ,चिक्कू ,मध यापासून आपल्याला वाईन विकसित करता येतील. युवा उद्योजकका प्रियांका सावे, दापोली मधून अण्णा महाजन यांनी वाईनरी सुरू केली आहे. आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाने वायनरी उद्योगाकडे पाहण्याचा प्रगत दृष्टिकोन ठेवला आहे.  सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देणे आणि यातून महाराष्ट्रात फळांच्या वाईन साठी अधिक मागणी निर्माण करणे असा हा निर्णय आहे. 

केवळ इतक्या पुरते न थांबता कोकणात हापूस आंबा, चिकू, जांभळे, अननस व अन्य फळांपासून छोट्या-छोट्या वायनरी शेतकऱ्यांना आपल्या बागेमध्ये विकसित करता येतील. फ्रान्स ,इटली किंवा स्वित्झर्लंडमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बागा मध्ये जाऊन पर्यटक वायनरी पाहतात आणि वेगवेगळ्या वाइनचा आस्वाद घेतात अशा स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन कोकणात भविष्यात सर्वच भागात विशेषता बागायती कोकणात विकसित होईल.

याकरता छोट्या-छोट्या वाईनरी ना परवानग्या देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. आजपर्यंत द्राक्ष वाईन ला एक्साईज माफ होते. आता कोकणातील शेतकऱ्यांच्या वाईनला एक लिटर ला एक रुपया इतका एक्साईज असणार आहे. या उद्योग निर्मितीसाठी सहजपणे परवानग्या मिळणे किंवा वाईन विक्रीसाठी असलेली बंधने कमीत कमी असणे अशा स्वरूपाचे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.


कोकण प्रदेशातील वायनरी टुरिझम विकसित होण्यासाठी या धोरणात्मक बदलांचा खूप उपयोग होणार आहे. यातून विशेषता युरोप मधील पर्यटक कोकणात आकर्षित होऊ शकतील. 

द्राक्षासव हे औषध हा वाईनचा एक प्रकार आहे. वाईन मध्ये 10 ते 12 टक्के अल्कोहल असते. आणि वाईनचे सेवन हे जगभर हेल्थ ड्रिंक म्हणून याकडे पाहिले जाते. युरोपमधील आणि जगभरातील प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाईन हे पेज लोकप्रिय आहे आणि याची भरपूर विक्री होते. हा उद्योग शेती पूरक आणि शेतकऱ्यांचा जोड धंदा असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा उद्योग एक वरदान आहे.


आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने दारूच्या दुकानांना वाईन शॉप म्हणतात. देशी दारू आणि विदेशी दारू ही नशा करणाऱ्यांसाठी आहे. खरे तर याला इंग्रजी मध्ये लिकर म्हणतात. आणि वाईन शॉप ला लिकर शॉप म्हटले पाहिजे.पण लिकर शॉप ला आपल्याकडे वाईन शॉप म्हटल्यामुळे वाईन म्हणजे दारू असा अनेकांचा समज आहे. 
दहा-बारा टक्के अल्कोहोल असल्यामुळे फळांच्या वाइन पासून नशा होत नाही. किंबहुना जगभर या पेयाकडे आरोग्यदायी पेय हेल्थ ड्रिंक म्हणून पाहिले जाते. ज्यांना नशा हवी त्यांच्यासाठी हे पेय नाही म्हणूनच आपल्या देशांमध्ये वाइन पिण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

 भविष्यात आपल्या देशात सुद्धा फळांच्या वाईन अधिक लोकप्रिय होतील याकरता सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा छोटा कुटिरोद्योग शेतकऱ्यांच्या बागेमध्ये करण्याचा व्यवसाय असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा उद्योग एक वरदान आहे. हे उच्चभ्रू लोकांचे पेय असल्यामुळे जगभरातील पर्यटकांना कोकणातील सागरी किनाऱ्यांवर आकर्षित करण्याकरता वायनरी टुरिझम फार प्रभावी होऊ शकेल. 
सरकारच्या वायनरी धोरणामध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिक्कू बागायतदार आणि पर्यटन व्यवसायिक छोट्या-छोट्या वायनरी कोकणातील पर्यटनाच्या गावांमध्ये विकसित करू शकतील. ज्याप्रमाणे नाशिक भागात द्राक्षापासून वाईनरी विकसित झाल्या तशा कोकणातील फळांपासून  छोट्या वायनरी शेतीपुरक उद्योग निर्माण करता येतील. आंतरराष्ट्रीय पर्यटन कोकणात विकसित होण्याकरता या उद्योगाचा खूप उपयोग होईल.म्हणूनच शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.

संजय यादवराव
समृद्ध कोकण प्रदेश संघटना

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.