● 'करुन करुन भागलो' आता सिंधुदुर्ग दौऱ्यावर
● सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार शुभारंभाचे प्रयोग
● नाट्यप्रयोगातून कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत
● सामाजिक उदात्त हेतुने नाट्यप्रयोग
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या या नाटकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त गरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती करून करून भागलो या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक सुहास पाटकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू कॅन्सर पीडित हे उपचारासाठी मुंबई ,कोल्हापूर, चिपळूण डेरवण येथे जात असतात. त्यांना उपचारासाठी गेल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे अगोदरच कन्सरसारख्या दुर्धर रोगामुळे तो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बेजार झालेले असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत असते या जाणिवेपोटी त्यांना सामाजिक बांधिलकीतून पाठबळ मिळावे हा उद्देश ठेवून नाटक आणि मनोरंजनाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ माऊली प्रोडक्शन (मुंबई) निर्मित सार्थक पेट आणि श्री देव पाटेकर प्रतिष्ठान आयोजित करून करून भागलों” धमाल विनोदी मालवणी नाटक रंगभूमीवर आणले आहे.
गेल्या दोन वर्षापासून हे नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे नाट्यगृह बंद होते. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा नाट्यगृहाचा पडदा उघडल्यामुळे रसिकांसमोर नाटकाचा प्रयोग करण्यासाठी सर्व कलाकार आतुर असल्याने 'करुन करुन भागलो' या नाटकाची उत्सुकता वाढलीय.