आजगावकर आजी'ज किचन

ही गोष्ट आहे धामापूरकरच्या एका घरातील, किंवा दुकानातील म्हणा हवं तर ! किंवा घरच्या दुकानातील म्हणा ना !! किंवा दुकानात असलेल्या घरातील म्हटलं तरी काही वावगे ठरणार नाही म्हणा.. धामापूरच्या रोहित आजगावकरने पर्यटन जिल्ह्यात पर्यटनातुन समृद्धी आणताना आपल्या आजीची गोष्ट सांगितलीय !

मुळात निसर्गसंपन्न धामापूर म्हणजे काही क्षणाकरता देवभूमी केरळच्या संपन्न हिरवाईची आठवण करुन देणारा प्रांत आहे. याच धामापूरमधले एक दुकान सध्या चर्चेचा विषय बनलय. 'आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर' नावाची ही पाटी कुण्या रोहित किंवा आणि तिच्या आजीची गोष्ट नाहीय तर या जिल्ह्यातील संपन्न असणाऱ्या खाद्यसंस्कृतीची ओळख आहे

रोहित आजगावकर हा धामापूरचा एक छोटासा उद्योजक.. नाविन्याच्या शोधात असलेल्या या नातवाला साथ दिली त्याच्या आजीने आणि सुरु झाला पर्यावरणपूरक खाद्य कारखाना 'आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर'. आपल्या राहत्या घरी व्यवसायाची मुहूर्तमेढ करत रोहितने आत्मनिर्भर सिंधुदुर्गचा नारा दिलाय.

रोहित हा मुळात मेकॅनिकल इंजिनियर. शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे शालेय शिक्षण घेऊन त्याने भारतीय विद्यापीठ, मुळशी इथून इंजिनीरिंग चे शिक्षण पूर्ण केले. पण या पठयाने इंजिनीरिंगची डिग्री घेऊन सुद्धा त्याने कॅम्पस प्लेसमेंट मध्ये भाग घेतला नाही आणि सरळ आपले निसर्गसंपन्न काळसे-धामापूर गाव गाठले. सुरुवातीची काही वर्षे एलआयसीचा व्यवसाय आणि जगण्यात गांधीजीच्या  ग्रामीण विकास तत्वज्ञान या मार्गावर चालताना त्याला हा उद्योगाचा मार्ग मिळाला. आजीच्या हातची चव, या चवीतून बनलेली गृहपयोगी वस्तू आणि दुकानाला दिलेली पारंपरिक मालवणी सजावट यामुळे आजगावकर आजी किचन इको स्टोअर चर्चेत आलय.

मालवणीची ओढ गावकुसापेक्षा जास्त महानगरांना आहे..उंबरे हरवलेली फ्लॅट संस्कृती आज गाव, गावची नाती आणि आजी मावशीला शोधतेय. आज हीच भावनिक गुंतवणूक हेरताना त्यात माया, सत्व, अस्सलपणा आणि दर्जा देण्याचे काम रोहित आजगावकर करतोय.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात खाजे पिठी याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, मात्र त्यात नावीन्य बदल याचा मात्र अभाव दिसतोय. इंजिनिअरिंग करताना पुन्हा गावाकडे वळणे, गावाकडे वळल्यावर गांधीजींचा शाश्वत ग्रामीण विकास वाचणे आणि वाचलेल्या गोष्टींना पुन्हा वर्तमानात पुन्हा उतरवणे यासाठी रोहित आजगावकर हे नाव आज जास्त गरजेचं बनलंय..

आहे त्यात आणखी वेगळं काय करणार या एका सिद्धांतावर अडून बसलेल्या स्वप्नाना रोहित आणि त्यांच्या आजीने दाखवलेली ही नव्या स्वप्नाची गोष्ट प्रेरणेचा नवा मार्ग दाखवेल !

रोहित आजगावकर :
आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर
काळसे- धामापूर, ता मालवण
 ७०८३५ ४२२५२

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.