सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिनांक 25 जानेवारी रोजी मंगळवारी अंध-अपंग, मूकबधिर कर्णबधिर अस्थिव्यंग इत्यादी तपासणीसाठी डॉक्टर येऊन दाखला देणार आहेत. हा उपक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्याकडून झाला आहे तरी या दाखल्याचा फायदा वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रमासाठी होणार असून प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अशा दाखल्याचा फायदा मासिक मानधन एक हजार रुपये मिळणार असून यासाठी तालुक्याच्या तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन सेतू मार्फत 50 हजार च्या आत उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्यांनी घेण्यात यावा
तसेच आपल्याला दाखला दिला आहे, तो दाखला सोबत संजय गांधी योजनेअंतर्गत कक्षामध्ये जाऊन सदरचा अर्ज भरून त्यात घ्यावा. यामध्ये रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँकेचे फोटो पासबुक सदरील दाखला अर्जासोबत द्यावा यामुळे आपल्याला संजय गांधी योजनेअंतर्गत हजार रुपये मानधन मिळणार असून याचा फायदा सर्व गोरगरीब जनता यांनी फायदा घ्यावा.
यासाठी वेगवेगळ्या जनतेसाठी शासकीय रुग्णालयामध्ये मोफत लाभ या दाखल्यामुळे मिळणार असून तसेच एसटी प्रवास खर्च सवलतीच्या दरामध्ये मिळणार असून त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी लाभ घेण्याचे कार्य करावे आणि यासाठी समाज उपयोगी कार्यकर्त्यांनी लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात यावे याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे
आरोग्यविषयक माहितीसाठी संपर्क-
राजेंद्र प्रभाकर मसुरकर
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान
संपर्क क्र 9422435760