SSPM हॉस्पिटलच्या वतीने मोफत अँजिओग्राफी शिबिराचे आयोजन

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदूर्ग येथे हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी 'मोफत अँजिओग्राफी शिबिर'

अँजिओग्राफी म्हणजे नेमकं काय ?

अँजिओग्राफी म्हणजे  कुठलीतरी शस्त्रक्रियाच असावी असा बऱ्याच जणांचा समज असतो. ‘अँजिओग्राफी’ ही उपचारपद्धती नव्हे, तर ती एक तपासणी आहे हे लक्षात घ्यायला हवे. ‘स्ट्रेस टेस्ट’ किंवा ‘एकोकार्डिओग्राफी’ या तपासण्या थेट हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या नसतात, तर रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या गुठळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम त्यात दिसतात. 

अँजिओग्राफीत मात्र हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा देणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) गाठी निर्माण झाल्या आहेत का, हे पाहायचे असते. आपल्या शरीरात हृदयापासून निघालेली महारोहिणी रक्तवाहिनी छातीपर्यंत आणि पुढे बेंबीच्या आसपास येते आणि तिथे तिचे दोन भाग होऊन एक भाग उजव्या पायात व एक भाग डाव्या पायात गेलेला असतो. अँजिओग्राफीत यातील सहसा उजव्या रक्तवाहिनीतून एक सूक्ष्म रबरी नळी घातली जाते आणि ही नळी रक्तप्रवाहाच्या उलटय़ा मार्गाने जाऊन हृदयाभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये ढकलली जाते. या नळीचे जे टोक बाहेरच्या बाजूला असते त्यातून ‘क्ष किरण’तपासणीत दिसून येईल असे एक प्रकारचे औषध घातले जाते आणि त्याच वेळी तपासणीचे वेगवेगळ्या कोनांनी अंतर्गत चित्रण घेतले जाते.

ही तपासणी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे शंभर टक्के निदान करते. नेमक्या कोणत्या रक्तवाहिनीत, कुठे आणि किती टक्के ‘ब्लॉक’ आहे, एकाहून अधिक रक्तवाहिन्यांत गुठळ्या आहेत का, याची माहिती या तपासणीत कळते.


● अँजिओग्राफी मोफत निदान आणि शस्त्रक्रिया शिबीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचे नाव असलेल्या एसएसपीएम लाईफटाइम हॉस्पिटलच्या वतीने आता अँजिओग्राफी उपचारासाठी मोठी घोषणा करण्यात आलीय.

अँजिओग्राफीचा सल्ला दिलेल्या रुग्णांसाठी मोफत अँजिओग्राफी' तसेच निदान झालेल्या रुग्णांसाठी 'अँजिओप्लास्टी' मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे.

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, यांच्यावतीने आयोजित अँजिओग्राफी' निदान आणि 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया ह्या संपूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहेत.


कसे व्हावे सहभागी ?
एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, यांच्यावतीने आयोजित अँजिओग्राफी' निदान आणि 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया या १५ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान होणार आहेत.

याउपचारासाठी साठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची ही यादी जाहीर करण्यात आलीय. केवळ रेशन कार्ड, आधार कार्ड एवढीच कागदपत्रे यासाठी आवश्यक असणार आहेत

● कसा साधावा संपर्क ?

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, यांच्यावतीने आयोजित अँजिओग्राफी' निदान आणि 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया या संपूर्णपणे मोफत असल्या तरी रुग्णांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.


एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, यांच्यावतीने आयोजित या उपचारासाठी काही महत्वाचे संपर्क क्रमांक हे पुढीलप्रमाणे आहेत.

◆ रुग्णालय रिसेप्शन क्रमांक ०२३६७-२३४००० 
◆ सौ. दुर्वा गंगावणे -९३७००५६०७६
◆  श्री. अनिल कुडपकर- ९४२०९०७६६१
◆ रितेश घाडीगावकर- ७०२०२९०३१६

हृदयशास्त्र विभाग : सिद्धेश रासम- ८३५५८८५६६७.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.