COSC चेअरमनपदी लष्करप्रमुख जनरल नरवणे,

लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी
● लष्करप्रमुखांना मिळाली तिन्ही दलांच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीची जबादारी
● लष्करप्रमुख बनले cosc चेअरमन
लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.  8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या अकाली निधनानंतर तिन्ही सेवांच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या समितीचे अध्यक्षपद रिक्त होते. जनरल नरवणे हे तिन्ही सेवेतील सर्वात वरिष्ठ प्रमुख असल्यामुळे COSC चे अध्यक्ष बनले आहेत आणि त्यामुळे पुढील CDS होण्याचा त्यांचा दावा बळकट झाला आहे.

● COSC म्हणजे नेमकं  काय ?

COSC ही तीन सेवांच्या प्रमुखांचा समावेश असलेली एक समिती आहे, जी तीन सेवांमध्ये ऑपरेशन्स आणि इतर समस्यांबाबत समन्वय राखण्यासाठी काम करते. सीडीएस पद निर्माण होण्यापूर्वी जी परंपरा होती, त्याच जुन्या परंपरेनुसार जनरल नरवणे यांना सीओएससीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. या परंपरेनुसार, तिन्ही सेवांच्या प्रमुखांपैकी सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची COSC चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात येत होती.

निवडीमागची पार्श्वभूमी 

देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाले होते. यावेळी ते आपली पत्नी आणि 12 इतर लष्करी अधिकाऱ्यांसह तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये एका कार्यक्रमात जात होते. त्यांचे MI-17V5 हेलिकॉप्टर लँडिंग साइटच्या अवघ्या 7 किमी आधी अचानक जंगलात पडले. या अपघातात जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 अधिकारी जागीच शहीद झाले होते. तर एकमेव जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचा 8 दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.