हिंदभूमीचा सुपुत्र !


बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून एक सर्वोच्च जबाबदारी सांभाळत होते.  सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे. 


बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा डेहराडूनला आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.


31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला होता. यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत सप्टेंबर 2016 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते कार्यभार पाहत होते. त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचे नेतृत्व देखील रावत यांनी केले आहे. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले होते


लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. '11 गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती. 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा सांभाळली. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती.


बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कार मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होती. त्यांच्या सेवेत रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले होते.

भारतमातेच्या या सुपुत्रास देशवासियांतर्फे शतशः नमन

राष्ट्रसिंधु | sindhudurg360°


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.