आता 'सखी' बनणार आधार

● सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम
● जिल्हा रुग्णालयात 'सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना
● पीडित महिलांना मिळणार वैद्यकीय मदत, कायदेशीर मार्गदर्शन आणि समुपदेशन !

● काय आहे सखी वन स्टॉप सेंटर ?

पीडित महिलांना एकाच छताखाली न्याय मिळावा या हेतूने सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला आणि बाल विकास विभाग केंद्र शासन यांच्या पुढाकाराने सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये खासगी, सार्वजनिक कार्यालयीन अथवा सांस्कृतिक अशा कोणत्याही स्तरावरील क्षेत्रात हिंसेला बळी पडलेल्या महिलेला आधार पुरवून , तिच्यावर होणाऱ्या हिंसेविरोधात दिलासा मिळवून देण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून करण्यात येत आहे .



सखी कसा देते आधार ?

पीडित किंवा हिंसाचार झालेल्या महिलांना या केंद्रामार्फत तात्काळ दिलासा देण्याचे काम करण्यात येते. यात सर्व प्रकारच्या महिलांवर हिंसाचाराचा समावेश आहे.हिंसाग्रस्त महिलांना तात्पुरत्या स्वरूपाची निवास व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात येते. या सखी वन स्टॉप सेंटरवर मानसिक आधार किंवा समुपदेश, निवासाची तात्पुरती सोय, कायदेविषयक मार्गदर्शन, पोलीसठाणे संदर्भातील सेवांची माहिती, वैद्यकीय मदत अशा सेवा पुरवण्यात येतात.

महत्वाचे म्हणजे..
◆सखी वन स्टॉप सेंटर मध्ये मोफत कायदेशीर सल्ला उपलब्ध आहे.

◆सखी वन स्टॉप सेंटर हे 24 तास खुले असते त्याचप्रमाणे दूरध्वनी सेवाही 24 तास सुरु असते

◆पोक्सो आणि सायबर क्राईम सारख्या प्रकरणातही पीडित महिलांना आवश्यक मार्गदर्शनाची सोय

◆सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत 157 महिलांना आणि एका बालकांलाही मदत करण्यात आलीय.


● कसा साधावा संपर्क ?

हिंसाग्रस्त महिलांसाठी सिंधुदुर्ग सामान्य रुग्णालयात महिला आणि  बाल विकास विभागामार्फत  १५ जुलै २०२० पासून सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वीत करण्यात आलं आहे. पीडित महिलांनी 181 किंवा 02362-229039या नंबरवर संपर्क केल्यास  मदत दिली जाईल, असं आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

नारीसिंधु | sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.