नाताळसाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर

● नाताळ सणाच्या निमित्तानं राज्यातील नागरिकांसाठी एक नवी नियमावली जाहीर

यंदाचा नाताळ साजरा करण्यासाठी राज्य सरकारची नवी नियमावली 2021 

  • ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा

  • स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50 % लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी  जास्त जणांचा समावेश नसावा.

  • कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.

  •  सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य

  • चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक

  •  चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी  कमीत कमी गायकांचा  समावेश करावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा

  • चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये

  • कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये.

  • फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.