● बेस्टसाठी बस थांब्यावर प्रतीक्षा करण्याची गरज संपली
● बस येण्याच्या लाईव्ह वेळेसहित बसचा लाईव्ह मागोवा
● लाईव्ह प्रवासी संख्या दर्शक, बसमध्ये किती गर्दी आहे हे कळणार, कमी गर्दी असलेली बस निवडता येणार
●मोबाईल तिकिटं आणि पास, सुट्या पैशाची कटकट नाही, पास केंद्रांवर जाण्याची गरज नाही
आता आपला बेस्टचा प्रवास बेस्ट आणि सुखकर होणार आहे. आता मुंबईची बेस्ट हायटेक होणार आहे. बेस्टने प्रवाशांसाठी एक विशेष ऍप (Best Chalo App) आणि कार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे या च्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवी असलेली बस ट्रॅक करू शकता. यामुळे बस थांब्यावर आपल्याला हवी असलेली बस कधी येणार याचा अचूक टाईम समजेल आणि यामुळे आपला वेळही वाचणार आहे
या ऍपचा मोठा फायदा म्हणजे म्हणजे तिकिट खरेदी करण्यासाठी आपल्याला रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही किंवा सुट्या पैसांची कटकट नाही. आता बेस्टच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार हे मात्र निश्चित आहे. मुंबईमध्ये लोकल प्रामुख्याने प्रवासासाठी वापरली जाते. दररोज हजारोंपेक्षाही जास्त लोक लोकलने प्रवास करतात. मात्र, ज्याठिकाणी लोकल पोहचत नाही. तिथे बेस्टची बस पोहचते.
●चलो ऍपची प्रमुख वैशिष्ट्य
- बस येण्याच्या लाईव्ह वेळेसहीत बसचा लाईव्ह मागोवा
- लाईव्ह प्रवासी संख्या दर्शक : बसमध्ये किती गर्दी आहे हे समजणार. कमी गर्दी असलेली बस निवडता येईल.
- मोबाईल तिकिटे आणि पास : सुट्या पैशाची कटकट नाही. कारण पास केंद्रांवर जाण्याची गरज नाही.
- 9 भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू
बेस्ट चलो बस कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये:
- कोणत्याही संपर्काविना कार्ड टॅप करुन पैसे द्या. कारण तुमचे कार्ड कायम तुमच्याबरोबरच राहणार.
- मोबाईल अॅप वापरुन कोणत्याही बसमध्ये किंवा ऑनलाईन रिचार्ज करता येईल.
- आपल्या पसंतीनुसार रिचार्ज करता येईल. 10 च्या पटीत 3000 रुपयांपर्यंत कितीही रकमेचा रिचार्ज करता येईल.
- कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाह्य होणार नाही.
- 1 जानेवारी 2022 पासून सर्व बसेस आणि शहरातील निवडक केंद्रांवर उपलब्ध
बेस्ट एनसीएमसी कार्डची प्रमुख वैशिष्ट्य :
बस कार्डाची सर्व वैशिष्ट्ये, अधिक मेट्रो किंवा एनसीएमसीचे पालन करणाऱ्या इतर कोणत्याही प्रणालीमध्ये भारतात सर्वत्र वापरता येईल.
- वेगवेगळ्या 72 पर्यायांमुळे प्रवासी प्रति फेरीसाठी योग्य असलेली योजना निवडू शकतात.
- प्रति फेरीसाठी 1.99 इतके कमी मूल्य.
- निवडलेल्या भाडे टप्प्यामध्ये बेस्ट नेटवर्कमधील वातानुकूलित असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही बसमधून कुठेही प्रवास करा.
- मोबाईल अॅपवर तसेच बस कार्डवरही खरेदी करता येईल. बेस्टच्या कोणत्याही बसमधील कंडक्टरकडून खरेदी करता येईल.