सिंधुदुर्गाचो स्वताचो शिनेमा : देवाक काळजी

सिंधुदुर्गची कलासंस्कृती आणि चळवळ आज जुन्या व नव्या संस्था व संघटना यांच्या माध्यमातून प्रचंड वेगाने विकसित झाली आहे. नाटक, एकांकिका, गायन, वादन, शॉर्टफिल्म्स इत्यादी अनेक कलाक्षेत्रात उदयोन्मुख कलावंतांना लोकांसमोर आणण्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी काही संस्थांनी पार पाडली आहे.

 चंद्रभागा प्रॉडक्शन, कणकवली या कलानिर्मितीसंस्थेला श्री.सुहास वरुणकर,श्री.दीपक परब,श्री.अभय खडपकर,श्री.विजय चव्हाण,श्री.रघुनाथ कदम,श्री.राजेंद्र कदम, श्री.संजय राणे श्री.हरिभाऊ भिसे श्री.शरद सावंत  अशा अनेक मान्यवर व्यक्तींचे सुरुवातीपासूनच असंख्य आशीर्वाद लाभले आहेत. गेली १४ वर्षे अखंडितपणे रसिकांना सेवा देणारी ही संस्था आज कणकवलीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला येत आहे ती याच महत्वाच्या व्यक्तिंमुळे.त्यांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली चंद्रभागा प्रॉडक्शन ने आजवर अनेक उपक्रम राबविले असून प्रत्येक उपक्रम नव्या पिढीला एक नवी दिशा देणारा ठरला आहे.

 चंद्रभागा प्रॉडक्शन ने नवीन निर्मिती करत असताना विविध ज्वलंत व प्रखर विषय हाताळले आहेत.त्यात 'विठ्ठल विठ्ठल' सारखी एकांकिका लोकांना परमेश्वर आणि माणूस यातील नातेसंबंध सांगून जाते….कधी विचार करून भावनाविवश करणाऱ्या शॉर्टफिल्म्स,तर कधी अगदी खळखळून हसवणाऱ्या वेबसिरीज प्रेक्षकांसाठी सादर केल्या आहेत.
          
चंद्रभागा प्रॉडक्शनने नुकतीच सुरू केलेली 'टगे' ही वेबसिरीज अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्यात सादर होणारे मिश्किल विनोद, त्यातील मांडणी आणि सादरीकरण यामुळे रसिकांतुन नवीन भागांच्या निर्मितीसाठी मागणी वाढत आहे.

एक नवे पाऊल आणि आपल्या मनोरंजक उपक्रमाला वेगळी उंची आणि दिशा देणारा 'देवाकच काळजी' हा एक मालवणी चित्रपट चंद्रभागा प्रॉडक्शन रसिकांसाठी घेऊन येत आहे. येत्या शनिवारी म्हणजेच ११ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता शुभारंभाचा प्रयोग वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे प्रदर्शित होणार आहे.सायंकाळी ७.०० वाजता देखील दुसरा प्रयोग सादर होणार असून या प्रयोगांना तहसीलदार, प्रांताधिकारी, नगराध्यक्ष, पोलीस अधीक्षक आणि अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित राहून या चित्रपटाचा आनंद घेणार आहेत.तसेच रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१ रोजी देखील दुपारी ४.०० आणि सायंकाळी ७.०० वाजता असे दोन प्रयोग होणार आहेत.
              
दोन दिवस या कलाकृतीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.तरी चंद्रभागा प्रॉडक्शन निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित त्याचप्रमाणेच सिंधुदुर्गातील मातीशी नाळ जुळलेला 'देवाकच काळजी' हा चित्रपट प्रदर्शनस्थळी येऊन रसिकांनी पहावा असे आवाहन चंद्रभागा प्रॉडक्शन तर्फे करण्यात आले आहे. या चित्रपटाची गीते प्रकाश मालंडकर यांनी लिहिली असून त्याचे संगीत धिरेश काणेकर यांनी केले आहे व पार्श्वसंगीत मितेश चिंदरकर यांनी केले आहे. या चित्रपटात सत्येंद्र जाधव ,राजेंद्र कदम ,उमेश तारी, रोहिणी झेंडे ,शेखर गवस, मिलिंद गुरव, प्रमोद तांबे, श्रद्धा परब, विवेक वाळके, सुहास वरुणकर ,पार्थ कोरडे, विठ्ठल गावकर, सत्यवान गावकर, सिद्धेश खटावकर, अमजद शेख यांच्यासह सिंधुदुर्गातील 80 स्थानिक कलाकारांनी काम केले आहे.

यासाठी तिकीटविक्री सुरू असून ती खालील पत्त्यावर उपलब्ध होतील. 

◆सुई-धागा कलेक्शन-कणकवली बाजारपेठ (७३८५४५४४९४).
◆सखी ब्युटी पार्लर - कणकवली कचेरीच्या पाठीमागे (९३२४२२७०३५). 
◆हाॅटेल आमराई-मराठा मंडळ रोड कणकवली (८७६५३२१३११). 
◆मयु’ज् मोबाईल - रामेश्वर प्लाझा कणकवली ,सारस्वत बॅंक शेजारी कणकवली (८३८०८२८७७२).

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.