चौपदरीकरणातील रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार

मुंबई गोवा चौपदरीकरणासंदर्भात चर्चा
● खासदार विनायक राऊत यांचा पुढाकार
● केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाणून घेतली वस्तुस्थिती
खदर विनायक राऊत यांनाही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रखडलेल्या कामाला लवकरच गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले आहेत.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पॅकेज सहा आरवली ते कांटे आणि पॅकेज सात कांटे ते वाकेड या दोन पॅकेजचे रखडलेल्या कामासंदर्भात ही चर्चा झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक दिल्ली येथे आयोजित केली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मा.ना.श्री. नितीनजी गडकरी यांनी दिले आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.